Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » कार्यालय म्हणजे भारतमातेचे पूजास्थान : डॉ. मोहनजी भागवत

कार्यालय म्हणजे भारतमातेचे पूजास्थान : डॉ. मोहनजी भागवत

=संघाच्या झेंडेवाला कार्यालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ=
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] –
rss-new-office-at-delhi-zendewala-dr-bhagwatकार्यालय ही आमच्यासाठी एक इमारत नसून भारतमातेच्या मंदिराचे पूजास्थान आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले.
रा. स्व. संघाच्या दिल्लीतील झेंडेवाला कार्यालयाच्या कोनशीला समारंभात डॉ. भागवत बोलत होते. सध्याचे झेंडेवाला कार्यालय पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक असे सात मजली कार्यालय बांधले जाणारा आहे. यावेळी रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह सुरेश सोनी, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही साधनसामग्री नसताना संघाच्या स्वयंसेवकांनी काम केले आहे, आजही तसे काम करण्याची शक्ती आणि तयारी आहे, कारण तो आमचा स्वभाव झाला आहे, असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, काम करताना आम्ही कधीच सोयीसुविधांचा विचार केला नाही, त्याची गरजही आम्हाला कधी भासली नाही. कार्यकर्त्यांचे सत्व हीच आमच्या कार्याची सिद्धी आहे. दगडामातीने बांधलेली इमारत म्हणजे कार्यालय नाही, तर कौटुंबिक वातावरण, आत्मियता, पवित्रता, शूचिता आणि कामाची प्रेरणा आम्हाला ज्या ठिकाणाहून मिळते, ती इमारत आमच्यासाठी कार्यालय असते. कार्यालय म्हणजे या सर्व प्रकारच्या भावनांचे केंद्र असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून त्यातून देशाला बाहेर काढण्याचे आमचे कार्य अव्याहत चालणारे आहे. ज्या आत्मियतेने आधी काम केले जात होते, तेवढ्याच आत्मियतेने आणि तळमळीने संघाचे स्वयंसेवक आजही काम करत आहे, असे ते म्हणाले.
कामाची गती वाढवण्यासाठी, ते व्यापक करण्यासाठी आवश्यकतेनुसार अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्यातही काही गैर नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. भागवत यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात नव्या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, त्यानंतर कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. दिल्लीचे प्रांत सहसंघचालक आणि केशव स्मारक समितीचे उपाध्यक्ष आलोककुुमार यांनी नव्या इमारतीच्या बांधकामाबाबतची माहिती दिली. प्रांतसंघचालक कुलभूषण आहुजा यांनी डॉ. भागवत यांचा परिचय करून दिला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयुष गोयल, भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह मोठ्या संख्येत स्वयंसेवक उपस्थित होते.

१९४७ मध्ये मिळाली होती सध्याची जागा
दिल्लीतील संघकार्यालयासाठी १९४७ मध्ये सध्याची जागा मिळाली होती. ही जागा गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने होती. तोपर्यंत हिंदू महासभेच्या भवनातच संघाचे कार्यालय होते. ही खोलगट जागा होती, काही बांधकामही त्या जागेवर होते. त्यातच संघाचे प्रचारक आणि स्वयंसेवक यांचे वास्तव्य होते. १९७२ मध्ये गोळवलकर गुरुजी यांनी ही जागा श्री केशव स्मारक समितीकडे सोपवली. या समितीने याठिकाणी संघ कार्यालयाची उभारणी केली. मात्र या कार्यालयाची इमारत जुनी तसेच जीर्ण झाल्याने तसेच कामाच्या दृष्टीने लहान पडत असल्याने हे कार्यालय पाडून त्याठिकाणी नवीन कार्यालय बांधले जात असल्याचे केशव स्मारक समितीचे उपाध्यक्ष आलोककुमार यांनी सांगितले.

साडेतीन लाख चौरस फुटात नवीन कार्यालय
झेंडेवाला परिसरात देशबंधू गुप्ता मार्गावर साडेतीन लाख चौरस फुट जागेत संघाचे नवे कार्यालय बांधले जाणार आहे. याठिकाणी पूर्वाभिमुख अशी सात मजली इमारत बांधली जाणार आहे. या ठिकाणी इमारतींचे ३ ब्लॉक राहणार असून, दिल्ली प्रांत कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय आणि केंद्रीय पदाधिकार्‍यांसाठी कार्यालय अशी व्यवस्था राहणार आहे. सामान्य स्वयंसेवकांना या कार्यालयात सहजपणे येता येईल, सुरक्षा व्यवस्थेचा कोणताही अडथळा राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
३ वर्षात नव्या कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प आहे.  नव्या कार्यालयाच्या बांधकामासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे आलोककुमार यांनी सांगितले. राजधानी दिल्लीतील संघाचे १ लाखावर स्वयंसेवक आणि हितचिंतकांकडून या कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी संकलित केला जाणार आहे. ७०० कारपार्किंगची व्यवस्थाही याठिकाणी राहणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1734 of 2108 articles)


  =संसद अधिवेशनात येणार विधेयक= वृत्तसंस्था नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] - ख्रिश्‍चन दाम्पत्यांची परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा आता ...