कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात नापाक हल्ले, सात अतिरेक्यांचा खात्मा

काश्मिरात नापाक हल्ले, सात अतिरेक्यांचा खात्मा

•महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रासह सात जवान शहीद
•भारतात घुसखोरीचा डाव उधळला,
वृत्तसंस्था
जम्मू, २९ नोव्हेंबर –
jammu-kashmir-map-6पाकिस्तानात नवे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी सूत्रे हाती घेताच, पाकधार्जिण्या अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरातील तीन ठिकाणी आज शक्तिशाली हल्ला चढवला. सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करणार्‍या तीन अतिरेक्यांचा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला, तर जम्मू शहराबाहेरील नाग्रोटा येथे लष्करी तोफखाना विभागाच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसह सात जवान शहीद व अन्य चार जवान जखमी झाले. शहीदांमध्ये महाराष्ट्रातील दोन वीरपुत्रांचा समावेश असून, मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नायक संभाजी कदम अशी त्यांची नावे आहेत. नाग्रोटा येथील चकमकीत पाच अतिरेक्यांनाही कंठस्नान घालण्यात आले.
अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होऊन पोलिसांच्या गणवेशात आलेल्या पाच अतिरेक्यांनी लष्कराच्या १६६ तोफखाना विभागावर बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात अधिकार्‍यांसह सात जवानांना वीरमरण आले. नाग्रोटा हे लष्कराच्या १६ कॉर्प्सचे मुख्यालय आहे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच हे मुख्यालय आहे. अतिरेकी व जवानांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत जोरदार गोळीबार सुरू होता. यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. याशिवाय, सावधतेचे उपाय म्हणून नाग्रोटा तहसिलीतील सर्व शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिस उपायुक्त सिमरंदीप सिंग यांनी दिली.
अतिरेक्यांनी केलेला हल्ला शक्तिशाली होता. आपले जवान शहीद झाल्याचे पाहून संतप्त झालेल्या जवानांनी अतिरेक्यांना चौफेर घेरले आणि पळ काढण्याचे सर्व मार्ग बंद केले. काही तास चाललेल्या या चकमकीत जवानांनी चारही अतिरेक्यांना यमसदनी धाडले, असे त्यांनी सांगितले.
संभाजी कदम, कुणाल गोसावी यांना वीरमरण
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील लष्करातील लान्स नायक संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूरचे रहिवासी असलेले मेजर कुणाल गोसावी या दोघांना चकमकीत वीरमरण आले आहे. ३५ वर्षीय संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी होते. संभाजी कदम यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी आणि ३ वर्षांची मुलगी आहे. संभाजी यांना दोन बहिणी असून त्या विवाहित आहेत. कुणाल गोसावी हे पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्ना गोसावी यांचे पूत्र आहेत. दोन जवान शहीद झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरताच नांदेड व पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर दुसरा हल्ला
नाग्रोटा येथे अतिरेक्यांसोबत चकमक सुरू असतानाच, सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, बीएसएफच्या सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. चार जवान जखमी झाले असून, यात बीएसएफच्या पोलिस उपमहानिरीक्षकांचा समावेश आहे.
रामगड सेक्टरमधून हे अतिरेकी भारतात आले होते. सांबा येथील चमियाल भागात असलेल्या बीएसएफच्या चौकीजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. पंपहाऊस भागात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने ग्रेनेड्‌स फेकताना बेछूट गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत जवानांनी तीन अतिरेक्यांना ठार केले. तिन्ही अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके रायफल्स व अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून, आणखी काही अतिरेकी आहेत काय, याचा शोध घेण्यासाठी जवानांनी चमियाल भागातील जंगलात व्यापक मोहीम उघडली आहे, अशी माहिती बीएसएफ अधिकार्‍याने दिली.
नियंत्रण रेषेवरूनही काही अतिरेक्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, लष्कराच्या सतर्क जवानांनी गोळीबार केल्यानंतर अतिरेक्यांनी गुलाम काश्मीरच्या दिशेने पळ काढला, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

वैष्णोदेवी मंदिराची सुरक्षा वाढवली
दरम्यान, एकाच दिवशी सलग तीन दहशतवादी हल्ले झाल्यानंतर माता वैष्णोदेवी मंदिराचा बेस कॅम्प असलेल्या कटरा शहराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नाग्रोटापासून कटरा शहर अगदीच जवळ असल्याने आणि वैष्णोदेवी मंदिर अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला असल्यामुळे या शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in जम्मू-काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1318 of 1895 articles)


=जेवढ्या नव्या नोटा भराल, तेवढी रक्कम काढता येणार= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर - नोटबंदीनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ...