Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » कॅस्ट्रोंच्या अंत्यसंस्काराला राजनाथसिंह जाणार

कॅस्ट्रोंच्या अंत्यसंस्काराला राजनाथसिंह जाणार

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर –
rajnath-singh_11क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि थोर क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
कॉंगे्रस, माकप, भाकप आणि समाजवादी पार्टीसह विविध राजकीय पक्षांचे नेते राजनाथसिंह यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. हे शिष्टमंडळ उद्या मंगळवारी सकाळी क्युबाची राजधानी हवानाकडे रवाना होणार असून, गुरुवारी सायंकाळी मायदेशी परत येणार आहे, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
या शिष्टमंडळात कोणाचा समावेश राहणार, याबाबतची रूपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून तयार करण्यात येत असून, यात परराष्ट्र व्यवहार आणि गृह मंत्रालयाचाही सल्ला घेण्यात येत आहे. कॅस्ट्रो यांचे २५ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1142 of 1692 articles)


    वृत्तसंस्था मुंबई, २८ नोव्हेंबर - स्वच्छ भारत अभियानात आपण दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आणि कामगिरीचे कौतुकही ...