Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची उदारता

केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची उदारता

♦आजारी महिला व मुलीला दिली आपली आरक्षित जागा
♦स्वत: केला इकॉनॉमीतून विमान प्रवास,
jayant_sinhaनवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या काळात सर्वसामान्यांना चांगल्या दिवसाची प्रचिती सातत्याने येत आहे. संकटात सापडलेल्यांना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सुषमा स्वराज यांनी तातडीने मदतीचा हात दिल्याचे अनेक किस्से ताजे असतानाच, त्यात आता केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्याही उदारतेची भर पडली आहे.
हवाई वाहतूक राज्यमंत्री असलेले जयंत सिन्हा यांनी प्रवास करीत असलेल्या विमानात एक मुलगी आणि तिच्या आजारी आईला मदतीचा हात दिला. रांचीची रहिवासी असलेल्या श्रेया प्रदीपने स्वत:च आपल्या ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. मी आपल्या आजारी आईसोबत इंडिगोच्या विमानाने बंगळुरूला जात होते. आईला चालता येत नसल्याने प्रवासात त्रास होऊ नये यासाठी विमानाच्या दरवाजाजवळील सीट आम्हाला देण्यात आली होती. विमान कोलकाता विमानतळावर काही मिनिटांसाठी उतरले, तेव्हा आम्हाला देण्यात आलेल्या दोन्ही सीट जयंत सिन्हा आणि त्यांची पत्नीसाठी आरक्षित असल्याचे समजले. विमानात प्रवेश करताच माझ्या आजारी आईविषयी जयंत सिन्हा यांना माहिती समजली, तेव्हा त्यांनी स्वत: आपल्या सीट आम्हाला दिल्या आणि स्वत: इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास निघून गेले, असे ट्विट श्रेयाने केले.
या प्रवासानंतर श्रेयाने जयंत सिन्हा आणि इंडिगो एअर लाईन्सला ट्विटरवर टॅग करून आभार मानले आहेत. अच्छे दिन ते आहेत जेव्हा केंद्रीय मंत्री आपली प्रथम श्रेणीतील सीट मला आणि माझ्या आजारी आईला देतात आणि स्वत: इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्यास निघून जातात… धन्यवाद सर, असे तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1428 of 1661 articles)


  तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] - सत्तेचा दुरुपयोग करीत नरेंद्र मोदी सरकार आपल्या विरोधातील आवाज दडपत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ...