Home » क्रीडा, ठळक बातम्या » कोहलीने केले नोटाबंदी निर्णयाचे स्वागत

कोहलीने केले नोटाबंदी निर्णयाचे स्वागत

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –
virat-kohli-testसिनेसृष्टीनंतर आता क्रीडाजगतातूनसुद्धा मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत आहे. हजार व पाचशेच्या नोटाबंदी करण्याचा निर्णय भारतीय राजकारणातील सर्वात मोठे पाऊल असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार व आक्रमक फलंदाज विराट कोहली म्हणाला.
काळापैशाविरुद्ध मोदी सरकारच्या कारवाईची ठिक-ठिकाणी प्रशंसा होत आहे. विराट म्हणाला की, मोदी सरकारच्या या निर्णयाने तर मी अतिशय प्रभावित झालो.
यापूर्वी, बॉक्सर मेरी कोम म्हणाली होती की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निर्णयाच्या पाठीशी आहे. या निर्णयामुळे लोकांना काही दिवस थोडा त्रास होईल, परंतु कमी पैशात घरखर्च चालविण्याचा नवा अनुभवसुद्धा मिळेल.
माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनेसुद्धा ट्वीट करून पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. नोटा बदलविण्यात त्रास होत असल्याची तक्रार करणार्‍या लोकांना त्याने थोडा त्रास सहन करण्याचा सल्लाही दिला.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (1283 of 1703 articles)


=चायना सुपर सिरीज बॅडमिंटन= वृत्तसंस्था फूझो, १६ नोव्हेंबर - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या विजयासह पुनरागमनाच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. ...