बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

बँकाचा एनपीए ‘संपुआ’चा सर्वात मोठा घोटाळा

►पंतप्रधानांचा गंभीर आरोप • बँकांचे, ग्राहकांचे, देशाचे हित जपण्याचे…

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

कोळसा घोटाळा : मधू कोडा दोषी

►कट रचल्याचा आरोप ►गुरुवारी सुनावणार शिक्षा, नवी दिल्ली, १३…

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

आधारला बँकेशी जोडण्याला कोणतीही मुदत नाही

►केंद्र सरकारचा निर्णय, नवी दिल्ली, १३ डिसेंबर – आधार…

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

नेपाळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता, भारतासाठी इशारा

काठमांडू, १३ डिसेंबर – पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांमुळे आधीच…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

संख्याबळाची दादागिरी खपवून घेणार नाही : गिरीश बापट

नागपूर, १३ डिसेंबर – विधान परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी…

दाऊदच्या टोळीत फूट

दाऊदच्या टोळीत फूट

►छोटा शकीलची वेगळी वाट; •गुप्तचर यंत्रणांची माहिती, मुंबई, १३…

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

विधानसभेत तिसर्‍या दिवशीही विरोधकांचा गोंधळ

►कामकाज ३ वेळा तहकूब ►मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर कामकाज सुरळीत, नागपूर,…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो कालवश

क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो कालवश

=भारताचा सच्चा मित्र हरपला=
वृत्तसंस्था
क्युबा, २६ नोव्हेंबर –
castro-fidelमहासत्ता अमेरिकेची तब्बल ५० वर्षे दमछाक करणारे आणि या देशाला एकहाती नमविणारे धाडसी क्रांतिकारी आणि क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आला.
क्युबावरील आपल्या ५० वर्षांच्या सत्ताकाळात कॅस्ट्रो यांनी अमेरिकेत सत्तेवर आलेल्या सुमारे १० राष्ट्राध्यक्षांना स्वबळावर नमविले होते. फ्लोरिडापासून अवघ्या ९० मैल अंतरावर असलेल्या क्युबावर राज्य करताना कॅस्ट्रो यांनी अमेरिकेला कधीच जुमानले नाही. १९६१ मध्ये अमेरिकेने क्युबावर आक्रमणही केले होते. त्यानंतर क्युबाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमामुळे जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते.
कॅस्ट्रो यांच्यावर कार्ल मार्क्स आणि रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते लेनिन यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. त्यानंतर ते कम्युनिस्ट विचारांकडे वळले. अमेरिकेच्या भांडवलशाही वृत्तीला बंधू रौल कॅस्ट्रो आणि क्रांतिकारी चे. गव्हेरा यांच्या मदतीने आव्हान दिले होते. कॅस्ट्रो हे क्युबामधील कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव होते. फेब्रुवारी १९५९ ते डिसेंबर १९७६ इतका दीर्घकाळ त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय सक्षमपणे जबाबदारी सांभाळली होती. जुलै २००६ मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी सर्व सूत्रे रौल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपवली आणि फेब्रुवारी २००८ मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एखाद्या देशाच्या प्रमुखपदी इतका दीर्घकाळ विराजमान राहणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगातील एकमेव नेते होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कॅस्ट्रो यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. विसाव्या शतकातील एक महान व्यक्तिमत्व आणि भारताचा सच्चा मित्र आज आम्ही गमावला आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले. तर, सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, कॅस्ट्रो यांच्या निधनाने केवळ क्युबाचेच नुकसान झाले नाही, तर भारताचेही मोठे नुकसान झाले आहे. भारतासोबत त्यांनी नेहमीच मैत्रिपूर्ण संबंध ठेवले होते.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1519 of 2092 articles)


= दोन दिवसांच्या सुटीचा परिणाम= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर - शनिवारी बँका बंद राहिल्याने सर्वसामान्यांना एटीएमचाच आधार घ्यावा लागला. ...