डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

डिजिटल युगाला दहशतवाद्यांचा धोका

►सायबर सुरक्षा सर्वात मोठा मुद्दा: • पंतप्रधानांचे प्रतिपादन, नवी…

भारतीय नौदलातही रणरागिणी

भारतीय नौदलातही रणरागिणी

►शुभांगी स्वरूप नौदलाच्या पहिल्या वैमानिक ►आर्मामेंट इन्स्पेक्शन विभागातही तीन…

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

१५ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

►•५ जानेवारीपर्यंत चालणार, नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर – संसदेच्या…

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

१ डिसेंबरला ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार पद्मावती

लंडन, २३ नोव्हेंबर – ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडल्यामुळे…

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

पाककडून गैर-नाटोचा दर्जा काढून घ्या

►अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत, वॉशिंग्टन, २३ नोव्हेंबर – मुंबईवरील २६/११…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » क्युबाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणारे कॅस्ट्रो!

क्युबाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणारे कॅस्ट्रो!

वृत्तसंस्था
क्युबा, २६ नोव्हेंबर –

FILE - In this July 11, 2014 file photo, Cuba's Fidel Castro speaks during a meeting with Russia's President Vladimir Putin, in Havana, Cuba. Social media around the world have been flooded with rumors of Castro's death, but there was no sign Friday, Jan. 9, 2015, that the reports were true, even if the 88-year-old former Cuban leader has not been seen in public for months. (AP Photo/Alex Castro, File)

महासत्ता अमेरिकेचा विचार केल्यास या देशापासून जवळच असलेला क्युबा हा देश अमेरिकेच्या तुलनेत मुंगीएवढाच आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर अमेरिकेने क्युबाचा नेहमीच विरोध केला. पण, त्या विरोधला न जुमानता क्युबाने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आणि अमेरिकेपुढे सातत्याने आपले आव्हान कायम ठेवले. क्युबाला ही ताकद केवळ फिडेल कॅस्ट्रो यांच्यामुळेच लाभली होती.
फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म क्युबातील एका समृद्ध कुटुंबात झाला. घरात जन्मजात श्रीमंती असल्याने त्यांना काहीच कमी नव्हती. मात्र, वाढत्या वयानुसार फिडेल यांना जगाची समज येत गेली आणि आजूबाजूची स्थिती कळू लागली. आपण राहतो ते जग आणि दीनदुबळ्यांचे जग यातील तफावत त्यांच्या काळजाचा ठाव घेऊ लागली. यातूनच पुढे ते मार्क्सवादी-लेनिनवादी बनले.
रोमन कॅथलिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हवाना विद्यापीठातून वकिली केली. तिथेच समाजशास्त्रात पदवी मिळवली. शिक्षणात अतिशय हुशार असणारे फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबातील तत्कालिन राजवटीविरोधात बंड पुकारले. क्युबात त्यावेळी बॅतिस्ता यांची राजवट होती. बॅतिस्ता यांची सत्ता अमेरिकेच्या जवळ जाणारी मानली जायची. किंबहुना, अमेरिकेनेही वेळोवेळी फिडेलविरोधात कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्ष भूमिका घेत बॅतिस्ताला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले होते. याविरोधात फिडेल धाडसाने उभे राहिले.
१९५३ मध्ये प्रथमच बॅतिस्ता यांच्या सत्तेविरोधात फिडेल यांनी सशस्त्र बंड पुकारले. लोकांमधून उठाव केला. १०० साथीदारांसोबत फिडेल यांनी राजवटीविरोधात हल्ला चढवला. मात्र, त्यांचा उठाव अयशस्वी ठरला. या हल्ल्यानंतर फिडेल आणि त्यांचा भाऊ रौल यांना तुरुंगात डांबण्यात आले. दोन वर्षांनंतर सुटका झाली. मात्र फिडेल शांत बसले नाही. त्यांनी पुन्हा जुलमी राजवटीविरोधात आवाज बुलंद केला. यावेळी अर्जेंटिनाचा तरुण क्रांतिकारी नेता चे गव्हेरा त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढला. अखेर १९५९ मध्ये भ्रष्टाचार, असमानता आणि जुलमी राजवटीचे प्रतीक ठरलेल्या बॅतिस्ता सत्तेचा पाडाव करून फिडेल सत्तेवर आले. फिडेल यांना क्युबावासीयांचे भक्कम समर्थन मिळाले.
१९५९ मध्ये क्युबात क्रांती झाली. क्युबाने साम्यवादी विचारसरणी स्वीकारली. ही क्रांती दडपण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले. मात्र, रौल कॅस्ट्रो आणि क्रांतिकारी नेता गव्हेरा यांच्या मदतीने फिडेल यांनी अमेरिकेला नमते घेण्यास भाग पाडले.
फिडेल कॅस्ट्रो हे क्युबामधील कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव होते. फेब्रुवारी १९५९ ते डिसेंबर १९७६ इतका दीर्घकाळ त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. क्रांती यशस्वी झाल्यानंतरही अमेरिकेने त्यांना त्रास देणे सुरूच ठेवले. त्यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्लेही झाले. संशयाची सुई अमेरिकेकडेच वळत होती. सीआयएने फिडेल यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अनेक कथा गोपनीय दस्तावेजातून उघड झाल्या. मात्र, फिडेल कधीही डगमगले नाही. डझनभर अमेरिकन अध्यक्ष आणि बलाढ्य सीआयएला त्यांनी एकहाती नमवले.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1401 of 1924 articles)


=पंतप्रधान मोदी यांचा ठोस संदेश= वृत्तसंस्था भटिंडा, २५ नोव्हेंबर - भारताचा हक्क असलेल्या सिंधू नदीतील पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानाला जाऊ ...