कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

कायदा मोडणार्‍यांना संरक्षण देऊ नका : सर्वोच्च न्यायालय

►गोरक्षणाबाबत खंडपीठासमोर सुनावणी , नवी दिल्ली, २१ जुलै –…

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित

►उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २१ जुलै –…

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

रामनाथ कोविंद मंगळवारी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारणार

►प्रणव मुखर्जी यांना उद्या संसदेत निरोप , तभा वृत्तसेवा…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

चिनी प्रसारमाध्यमे म्हणतात, स्वराज संसदेत खोटे बोलल्या

►चीनची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, बीजिंग, २१ जुलै –…

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी संपली

►आता निकालाची प्रतीक्षा, इस्लामाबाद, २१ जुलै – पनामा पेपर्स…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

विश्‍वजित कदम, अविनाश भोसले यांच्या कार्यालयांवर धाडी

►आयकर विभागाची कार्यवाही, पुणे, २१ जुलै – उद्योजक अविनाश…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » गुलाम नबी आझाद यांच्या विधानावरुन राज्यसभेत गदारोळ

गुलाम नबी आझाद यांच्या विधानावरुन राज्यसभेत गदारोळ

=कामकाज स्थगित=
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर
ghulam-nabi-azadनोटबंदीच्या मुद्यावरून आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरात अनेकदा स्थगित करावे लागले, नंतर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या एका विधानामुळे सभागृहातील वातावरण तापले. भाजपा सदस्यांनी यावर तीव्र हरकत घेत माफीची मागणी केली.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर बुधवारी राज्यसभेत चर्चा सुरू झाली होती, आज दुसर्‍या दिवशीही ही चर्चा सुरू राहणार होती. मात्र आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये येत घोषणा सुरू केल्या. नोटा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे सदस्य करत होते. पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात उपस्थित राहण्याची मागणीही संतप्त सदस्य करत होते. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारनंतर कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाची तुलना उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेशी केली. नोटबंदीच्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशभरात जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला, त्याच्या अर्धेही सैनिक उरी येथील दहशतवादी हल्ल्यात मारले गेले नाही, असे आझाद म्हणाले. आझाद यांच्या या विधानामुळे भाजपा सदस्य संतप्त झाले. अशी तुलना करत विरोधी पक्षनेते देशाचा अपमान करत आहे, असे शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले. या दोन घटनांची तुलना करुन पाकसमर्थित दहशतवादाचे तर आझाद समर्थन करत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत नायडू यांनी आझाद यांच्या माफीची मागणी केली. आझाद यांच्याविरोधात भाजपा सदस्यांनी घोषणा सुरू केल्या. आझाद यांचे विधान कामकाजातून वगळण्याची भाजपा सदस्यांची मागणी होती. प्रत्युत्तरात विरोधी सदस्यही घोषणा देऊ लागले. आपल्या विधानावर ठाम राहात आझाद यांनी माफी मागण्यास नकार दिला, त्यामुळे सभागृहातील गोंधळ आणखी वाढला. जोपर्यंत पंतप्रधान सभागृहात उपस्थित राहणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीच चर्चा होऊ देणार नाही, असे बसपाच्या मायावती म्हणाल्या. तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनीही अशीच भूमिका घेतली. विरोधकांची चर्चा करण्याची तयारी नाही, त्यामुळे ते गोंधळ घालत आहे, असा आरोप संसदीय कामकाम राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.
तत्पूर्वी आज सकाळी कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी सदस्यांनी घोषणबाजी सुरु केली. उपसभापती पी. जे.कुरियन सदस्यांना शांत राहण्याचे आणि आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन करत होते. मात्र सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत दोनदा कामकाज स्थगित करावे लागले. दुपारी १२ वाजता कामकाज सुरू होताच अध्यक्ष हमीद अन्सारी पीठासीन होते. विरोधी सदस्यांनी पुन्हा वेलमध्ये धाव घेत घोषणा सुरू केल्या. सदस्यांनी शांत राहण्याचे आवाहन अन्सारी करत होते, मात्र सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी आधी अर्धा तासासाठी आणि नंतर दुपारी २ पर्यंत कामकाज स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1830 of 2231 articles)


वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर मित्रपक्ष शिवसेना भाजपा विरोधकांशी हातमिळवणी करीत ममतांच्या रॅलीत सहभागी झाल्याने नाराज शिवसेनेची समजूत काढण्यासाठी केंद्रीय ...