Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » जगातील पहिले कॅशलेस शहर होऊ शकते पुणे

जगातील पहिले कॅशलेस शहर होऊ शकते पुणे

वृत्तसंस्था
पुणे, २९ नोव्हेंबर –
piyush-goyal_0नोटाबंदीनंतर पुणे शहरात ज्याप्रकारे उत्साह आणि समर्थन मिळाले आहे, ते पाहता पुणे हे जगातील पहिले कॅशलेस शहर बनू शकते. यासाठी ऍक्शन कमिटीची आवश्यकता असून शहरातील फूटपाथवाल्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी डिजिटल पेमेंटचा पर्याय स्वीकारायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जाराज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
दोन दिवसांच्या पुणे दौर्‍यावर गोयल आले होते. यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, देशात सर्वत्र कॅशलेस व्यवहार झाल्यास वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची बचत होईल. ही बचत चलनाची छपाई आणि त्याच्या वाटपाचा खर्च वाचल्याने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. याला पुणे शहरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे.
स्मार्ट सिटीत पुणे शहराची निवड झाली आहे. खर्‍या अर्थाने पुण्याला स्मार्ट सिटी बनवायचे आहे. जगात खूपच कमी शहरे अशी आहेत की तेथे पूर्ण व्यवहार डिजिटल होतात. शहरात युवाशक्ती, तंत्रज्ञान आणि बौद्धिक भांडवल आहे. याबरोबर हे शहर शिक्षण, आयटी आणि ऑटोमोबाईलचेही केंद्र आहे. देशामध्ये कोणतेही शहर पुण्यासारखे नाही. यामुळे पुणे हेच ‘फास्टेट डिजिटल कनेक्टेड सिटी’ बनेल. यासाठी एक ऍक्शन कमिटी नेमावी, त्याच्या माध्यमातून १५ दिवस शहरातील नागरिकांना डिजिटल जगाच्या संपर्कात ठेवा. या पंधरा दिवसांत सर्व व्यवहार क्रेडिट, डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून करा. छोट्या टपरीवाल्यापासून ते मोठ्या व्यावसायिकापर्यंत सर्वांना हा पर्याय स्वीकारायला लावा. यामुळे सुट्या पैशांची अडचणीही जाणवणार नाही, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (975 of 1549 articles)


    =कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल= वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर - संपूर्ण देशाला कॅशलेस बनवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेला ...