Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » जपानकडून भारत खरेदी करणार

जपानकडून भारत खरेदी करणार

♦अम्फिबियन विमाने
♦दहा हजार कोटींचा करार होण्याची शक्यता
♦पंतप्रधान मोदी ११ पासून जपान दौर्‍यावर,
amphibious-aircrafts-japanनवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ नोव्हेंबरपासून जपान दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍यामध्ये जपानकडून युएस२आय ही १२ अम्फिबियन विमाने खरेदी करण्याच्या करारावर अंतिम स्वाक्षर्‍या होण्याची शक्यता आहे. यासाठी सेनादला तसेच पीएमओतील अधिकार्‍यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय पंतप्रधान शिंबे यांच्याबरोबर नागरी अणूवापर कराराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍यातील प्रमुख करारांमध्ये सेनादलासाठी अम्फिबियन विमान खरेदी, नागरी अणू उर्जा करारावर चर्चा व स्वाक्षर्‍या होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाणी आणि जमीनीवरही उतरू शकणारी १२ अम्फिबियन विमान खरेदीचा प्रस्ताव २०१३ पासून प्रलंबीत आहे. या करारासाठी जपानने सुमारे ७२० कोटी रूपये किमत कमी करण्यासही सहमती दर्शवली आहे, हेही विशेष मानले जात आहे. चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी जपान उत्सुक असल्याने या दौर्‍यामध्ये हा करार पूर्णत्वास जाऊ शकतो, असा सामारिक तज्ज्ञांचा अंदाज आहे.
घुसखोरी, तस्करीला आळा घालणे सुलभ
या विमानांचा सर्वाधिक लाभ तटरक्षक दल, नौदल तसेच समुद्री पोलीस चौक्यांना अधिक प्रमाणात होणार आहे. त्यामुळे खरेदी करार अस्तित्वात आल्यास समुद्रीगस्त अधिक प्रभावशाली होऊन त्या मार्गाने होणारी दहशतवाद्यांसह अन्य सर्व प्रकारची घुसखोरी, शस्त्रास्त्रांची तस्करी याला आळा घालता येणे शक्य होणार आहे. शिवाय दुर्घटनाप्रसंगी बचाव सामग्री व जवान वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे दुर्घटनांमधील मनुष्य हानी टाळणे शक्य होणार आहे.
दक्षिण समुद्रातील अनेक क्षेत्रांमध्ये चीनचा वाढता प्रभाव जपान आणि भारतासाठीही चिंताजनक असाच आहे. त्यामुळे या उपखंड आणि भागातील शांतता कायम ठेवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच जपाससह आस्ट्रेलिया, अमेरिकेला बरोबर घेऊन नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे. यासाठी भारतीय नौदल गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेबरोबर मलाबार कवायतीमध्ये सहभागी होत आहे.
हा करार झाल्यास जपानकडून संरक्षण संबंधी उपकरणांची पहिल्यांदाच विक्री केली जाणार आहे. गेल्या पाच दशकांपासून लष्करी उपकरणे, शस्त्रास्त्रे विक्रीवर जपनाने प्रतिबंध लादून घेतले होते. सोमवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण सामग्री व्यवहार समिती १२ अम्फिबियन विमान खरेदीच्या सौद्यातील मसुद्याला अंतिम स्वरूप देतील, असेही संरक्षण व पीएमओतील अधिकार्‍यांनी सांगितले. याशिवाय मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांच्यामध्ये नागरी अणूउर्जा वापराबाबत सहकार्य करार करण्याविषयीही चर्चा होणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1902 of 2099 articles)


=रा. स्व. संघाची स्पष्ट भूमिका= कॅनकोना, [५ नोव्हेंबर] - केरळ आणि कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. ...