Home » ठळक बातम्या, नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय » जलवाहतुकीमुळे इंधनाची बचत : गडकरी

जलवाहतुकीमुळे इंधनाची बचत : गडकरी

nitin-gadkari2तभा वृत्तसेवा
मुंबई, [७ नोव्हेंबर] – जवाहर द्विप येथे ऑईल जेट्टी, बंकरिंग टर्मिनल व रोरो पॅक्स सेवा या तीन प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासाला गती मिळणार असून, जलवाहतूक सुरू झाल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन इंधनाची बचत होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले.
भाऊचा धक्का येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ऑईल जेट्टी, प्रवासी टर्मिनल आणि बंकरींग टर्मिनलच्या कामाचा भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
राज्य शासनाने प्रवासी जेट्टींकरिता ६९ प्रस्ताव पाठविले होते. त्यातील बोरीवली, गोराई, विरार अशा नऊ जेट्टींच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची घोषणा करीत उर्वरित ६० प्रकल्पांनाही लवकरच मंजुरी देऊ, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
मुंबईच्या विकासास सुरवात होत आहे याचा मला एक मुंबईकर म्हणून आनंद होत आहे. कॉंग्रसच्या कार्यकाळात पर्यटनाच्या विरोधात भूमिका घेतल्या गेल्या. परंतु आम्ही हे चुकीचे निर्णय रद्द केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मुंबई रेडिओ क्लब प्रकरणाबाबात बोलताना गडकरी म्हणाले की, मुंबईच्या रेडियो क्लबच्या विरोधात खटला सुरू आहे. मात्र गेल्या ६ वर्षात याबाबत सुनावणी का होऊ शकली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्य न्यायधीशाना पत्र लिहून याबाबत लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रदूषणाची समस्या दिल्लीकरांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. त्यामुळे आपण वेळीच खबरदारी घ्यावयास हवी. मुंबईतले प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. समुद्रात दूषित पाणी सोडण्यापेक्षा ते पाणी शुद्ध करून सोडले तर प्रदूषण होणार नाही. अनेक पेट्रोलियम कंपन्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असून, अशा कंपन्या बंद व्हायला हव्यात, असे गडकरी यावेळी म्हणाले.
मुंबईकरांचे जलवाहतुकीचे स्वप्न पूर्ण- मुख्यमंत्री
भाऊचा धक्का ते मांडवा ते नेरूळ यादरम्यान रोरो प्रवासी सेवा मार्च २०१८ पूर्वी सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. यामुळे जलवाहतुकीचे मुंबईकरांचे २० वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे सेवा, बेस्ट या दळणवळणाच्या सेवांचा सर्वंकष दृष्टिकोनोतून विचार करून त्या एकत्रित करण्यात येत आहेत. त्यामध्ये आता जलवाहतुकीचाही समावेश करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, आज तीन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ झाला आहे. मार्च २०१८ पूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मांडवा ते भाऊचा धक्का आणि नेरूळ हे अंतर पार पाडण्यासाठी रस्ता मार्गे किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी जातो. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यावर हे अंतर अवघ्या १५ ते १७ मिनिटांत पार करता येणार आहे. रोरो सेवेमुळे फक्त प्रवाशीच नव्हे तर बस, कार यांची देखील वाहतूक केली जाणार असल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी होऊन पर्यायाने इंधनाची बचत आणि प्रदूषणही कमी होणार आहे. मुख्य म्हणजे सामान्यांच्या प्रवासाच्या वेळेत होणारी बचत ही महत्त्वपूर्ण आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, नागरी, मुंबई-कोकण, राष्ट्रीय (1448 of 1686 articles)


    =निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका= नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] - फौजदार खटल्यांमध्ये आमदार आणि खासदार दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्याच टप्प्यात ...