Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जवानांना दिवाळी शुभेच्छा पाठवा

जवानांना दिवाळी शुभेच्छा पाठवा

=पंतप्रधान मोदी यांचे आवाहन=
narendra-modi12नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – आपल्या सीमांचे रक्षण करीत असलेल्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी देशवासीयांना त्यांना येत्या दिवाळीत शुभेच्छा संदेश पाठवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यासाठी ‘संदेश टू जवान’ या शिर्षकाखाली आपल्या ऍपवर मोहीमच उघडली आहे. याशिवाय, आकाशवाणी आणि दूरदर्शनवरूनही नागरिक सीमेवरील जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवू शकणार आहेत. दिवाळीसारखा राष्ट्रीय सण असतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीमांचे रक्षण करणार्‍या जवानांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्यास त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल, असा मला विश्‍वास असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मी जवानांना आपला संदेश पाठवला आहे. तुम्ही देखील आपला संदेश पाठवा. तुमच्या शुभेच्छा त्यांना नक्कीच आनंद देतील. कोणताही सण साजरा न करता आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना आपल्या शुभेच्छांची अतिशय आवश्यकता आहे… जय हिंद!

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1625 of 1673 articles)


    =भाजपाचे आव्हान= नवी दिल्ली/लखनौ, [२३ ऑक्टोबर] - शिवपाल यादव यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे सरकार आता बहुमतात राहिले नाही. तेव्हा ...