Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » जवानांना फराळ वाटत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी

जवानांना फराळ वाटत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी

किन्नौर, [३० ऑक्टोबर, (हिं.स.)] : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये सैन्य, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत दिवाळी साजरी केल्याने जवानांच्या आनंदात भर पडली. पंतप्रधान मोदी यांनी तासभर जवानांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी भारत-चीन सीमेवर असलेल्या ॠआयटीबीपी’च्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र पंतप्रधान मोदी मोदी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील समदो येथे पोहोचले. तर दिवाळीत पंतप्रधान सोबत आल्याने जवानांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. समदो येथे जाण्यापूर्वी मोदी काही वेळ चांगो या गावातही थांबले व त्यांनी येथील गावकर्‍यांशी संवाद साधला. खुद्द पंतप्रधान आपल्या गाव्यात आल्याचे पाहून गावकर्‍यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. सीमा रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपला कार्यक्रम गुप्त ठेवला.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2002 of 2136 articles)


    =ही दिवाळी जवानांना समर्पित करा= नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : देशातील विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या जवानांमुळेच देशातील जनतेची ...