Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण, राजकीय, राष्ट्रीय » ज्येष्ठ भाजपा नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

ज्येष्ठ भाजपा नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

jayawantiben-mehta-bjpमुंबई, [७ नोव्हेंबर] – अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये १९९६ ते १९९९ या काळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे रविवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. आज सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्कवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
जयवंतीबेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्या ते नगरसेवक, आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास करणार्‍या जयवंतीबेन मेहता यांनी १९६२ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता. १९६८ मध्ये त्या मुंबई महानगर पालिकेवर नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आल्या होत्या. सुमारे १० वर्षे त्या मुंबई महापालिकेत होत्या.
१९७५ मधील आणीबाणीच्या काळात त्या सुमारे १९ महिने तुरुंगात होत्या. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी प्रथमच राज्य विधानसभेची निवडणूक निवडणूक लढवली आणि आमदार झाल्या. त्यानंतर त्या पुन्हा आमदार झाल्या. १९८० मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर नियुक्ती झाली आणि १९८८ मध्ये त्या भाजपाच्या सचिव झाल्या. १९८९ मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. लोकसभेत त्यांनी दक्षिण-मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. नंतर अकराव्या व तेराव्या लोकसभेत १९९६ आणि १९९९ अशा सलग दोन निवडणुकीतही त्या विजयी झाल्या. १९९१ ते ९५ या काळात त्यांनी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून आणि १९९३ ते ९५ या काळात भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
१९९६ ते १९९९ या काळात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय उर्जा राज्यमंत्री पदही भूषवले होते. यासह भाजपातील अनेक महत्त्वापूर्ण पदांवर जयवंतीबेन यांनी स्वत:ची छाप पाडली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे मुरली देवरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
मान्यवरांच्या संवेदना
जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाची माहिती कळताच भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर, डॉ. मुरली मनोहर जोशी, राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण, राजकीय, राष्ट्रीय (1712 of 1963 articles)

    muslim-mahila
    =पर्सनल लॉ बोर्डाच्या स्वाक्षरी मोहिमेवरही केला प्रहार= लखनौ, [६ नोव्हेंबर] - शरियत कायद्यांतर्गत देशातील मुस्लिम महिला स्वत:ला सुरक्षित समजतात, असा ...