Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » झारखंडमध्ये सहा नक्षल्यांचा खात्मा

झारखंडमध्ये सहा नक्षल्यांचा खात्मा

=६०० काडतुसा, १२ आयईडी व शस्त्रसाठा जप्त=
वृत्तसंस्था
रांची, २३ नोव्हेंबर –
naxalisumझारखंडच्या नक्षलप्रभावित लातेहार जिल्ह्यातील जंगलात सीआरपीएफच्या कमांडोंनी एका भीषण चकमकीत सहा नक्षल्यांचा खात्मा केला. त्यांच्याजवळून ६०० बुलेट्‌स, सुमारे १२ आयईडी आणि अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील उत्तर कोयल नदीच्या किनार्‍याला लागूनच घनदाट जंगल आहे. या भागात काही नक्षलवादी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या कमोंडांनी आज सकाळी सातच्या सुमारास धाड टाकली. जवानांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुमारे दोन ते अडीच तास सुरू होती. नक्षल्यांकडून गोळीबार थांबल्यानंतर जवानांनी शोधमोहीम उघडली असता, सहा नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्या जवळच मोठ्या प्रमाणात शस्त्र व काडतुसांचा साठा पडला होता, अशी माहिती सीआरपीएफच्या झारखंड विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय लथकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
१२ शक्तिशाली आयईडी आणि त्यांचा स्फोट घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले वायर्स व अन्य साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे. या चकमकीनंतर जंगलात आणखी काही नक्षलवादी आहेत काय, याचा शोध घेण्यासाठी जवानांनी मोहीम उघडली असून, हेलिकॉप्टर्सचीही मदत घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य (1356 of 1841 articles)


=रुग्णालयाने नाकारल्या ५०० च्या जुन्या नोटा= वृत्तसंस्था बंगळुरू, २३ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनता थोड्या फार प्रमाणात का ...