Home » अर्थभारत, छायादालन, ठळक बातम्या » झोपेतही मुकेश अंबानी कमावतात तब्बल ४ कोटी

झोपेतही मुकेश अंबानी कमावतात तब्बल ४ कोटी

=फोर्ब्स मॅगझिनची माहिती=
mukesh-ambani1मुंबई, [२९ ऑक्टोबर] – लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेली व्यक्ती कोण, असा सवाल केला तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचेच नाव सर्वप्रथम ओठावर येते. दिवसागणिक आपल्या संपत्तीत वाढ करणारे अंबानी अगदी झोपेत असतानाही तब्बल ४ कोटी रुपयांची कमाई करतात, अशी माहिती फोर्ब्स मॅगझिनने दिली आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फोर्ब्सने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलिवूडमधील श्रीमंतांची यादी आणि त्यांच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली त्यात सलग नवव्यांदा ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
अंबानींची एकूण मालमत्ता २२.७ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १.५२ लाख कोटी रुपये एवढी आहे. त्यांचा महिन्याचा पगार ३९ कोटी रुपये आहे. मुकेशजी अवघे सात तास झोपतात. त्यानुसार त्यांच्या एकूण मालमत्तेचा हिशोब करता, ते झोपेतही ४ कोटी ३७ लाख रुपये कमावतात, अशी माहिती फोर्ब्सने दिली आहे.
याशिवाय टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने यंदा २०७ कोटी रुपये कमावले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतरही १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे, तर विराट कोहलीने वर्षभरात १९२ कोटी रुपये कमावले आहेत. कॉमेडी किंग कपिल शर्माने ६० कोटी कमावले असून लाखो दिलोंकी धडकन् असलेल्या आणि बॉलीवूडबरोबर हॉलीवूडमध्ये आपले स्थान मिळविलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने ६७ कोटी रुपये कमावले असून जगभरातल्या सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप १० अभिनेत्रींमध्येही दीपिका दहाव्या क्रमांकावर आहे.
सैराटचीही नोंद फोर्ब्समध्ये …
नागराज मंजुळेंच्या सैराट या विश्‍वविक्रमी चित्रपटाचीही नोंद फोर्ब्सने घेतली आहे. आंतरजातीय विवाह करणार्‍या प्रेमीयुगुलाची कथा रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली, असेही मासिकाने म्हटले आहे. मेनस्ट्रीम गाणी आणि नृत्य असूनही वेगळ्या व ज्वलंत प्रश्‍नावर भाष्य करणारा हा सिनेमा मनाला भिडतो, असे फोर्ब्सने म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेत्री ज्या गोष्टी करण्यासाठी घाबरतात अशा गोष्टी आर्चीने केल्या आहेत. जसे, आर्ची परशाला पोलिसांपासून सोडविते अशा वेगळ्या स्टाईलचा रोल रिंकूने धीटपणे केल्याबद्दल तिचे कौतुक फोर्ब्सने केले आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under अर्थभारत, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in अर्थभारत, छायादालन, ठळक बातम्या (1563 of 1681 articles)


    ♦सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल ♦अधिकार नाकारणे म्हणजे श्रमाचे शोषणच, नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] - नियमित कर्मचारी ज्या पद्धतीचे काम करतात, ...