Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ‘टीम ट्रम्प’च्या निवडीसाठी गट स्थापन

‘टीम ट्रम्प’च्या निवडीसाठी गट स्थापन

=धोरणबदल, नियुक्ती यासाठीही सल्ला देणार=
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, [१३ नोव्हेंबर] –
donald_trumpअमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी २०१७मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आपल्या मंत्रिमंडळात योग्य व्यक्तींचा समावेश असावा, यावर त्यांचा कटाक्ष आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या विश्‍वासातील लोकांचा एक गट स्थापन केला आहे. या गटात ट्रम्प यांच्या दोन मुलांचा आणि एका मुलीचाही समावेश आहे, हे विशेष.
अमेरिकेचे भावी उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे गटप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. कन्या इव्हाका आणि दोन मुले एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर हे त्यांना सहकार्य करणार आहेत. ट्रम्प यांचे जावई जेरेड यांचाही ‘टीम ट्रम्प’मध्ये समावेश आहे. प्रचारादरम्यान ज्या मोजक्या नेत्यांनी ट्रम्प यांची अखेरपर्यंत पाठराखण केली त्यांच्यावरच ट्रम्प यांनी विश्‍वास दाखविला आहे.
अमेरिका सरकारचे नवीन धोरण, विविध पदांवरील नियुक्ती, मंत्रिमंडळातील सहकार्‍यांची नियुक्ती, याबाबत हा गट निर्णय घेणार आहे. करकपात करणे, स्थलांतरितांचा ओघ कमी करणे अशी महत्त्वाची आश्‍वासने ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिली होती, हे विशेष.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1263 of 1606 articles)


    वृत्तसंस्था नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] - लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या नागरी सेवा परीक्षांसाठी पारंपरिक प्रवेशपत्रांऐवजी ‘ई-ऍडमिट कार्ड’ जारी करण्यात ...