Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » डोनाल्ड ट्रम्प महासत्ताधीश!

डोनाल्ड ट्रम्प महासत्ताधीश!

♦अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष
♦हिलरी क्लिटंन यांचा पराभव,
donald_trump-1न्यूयॉर्क, [९ नोव्हेंबर] – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बुधवारी डेमॉकॅ्रटिक पार्टीच्या हिलरी क्लिटंन यांचा पराभव केला आणि व्हाईट हाऊस गाठले. विजयासाठी २७० मतांची गरज असताना २८६ चा आकडा पार करणारे ट्रम्प या ऐतिहासिक विजयामुळे महासत्ता अमेरिकेचे ‘महासत्ताधीश’ ठरले आहेत. ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना २८६ मते आणि हिलरी क्लिटंन यांना २१५ इलेक्ट्रॉलर मते मिळाली आहेत. व्हाईट हाऊसचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प आणि हिलरी क्लिटंन यांच्यात अतिशय अटीतटीची लढाई झाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोघेही एकमेकांना काट्याची टक्कर देत होते. यामुळे कोण विजयी होणार, हे सांगणे कठीण होते. नंतर मात्र ट्रम्प यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि अखेरीस ५३८ इलेक्ट्रॉल कलिग मतांमध्ये २७० चा जादुई आकडा पार करून विजयी झाले.
हिलरी क्लिटंन याच अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष होणार, असे भाकीत निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासून करण्यात येत होते. निवडणुकीआधीच्या तीन महाचर्चांमध्येही क्लिटंन यांनी बाजी मारली होती. पण, प्रत्यक्ष मतदानात त्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या.
अब्जोपती व्यवसायिक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनेसिव्हेनिया, ओहिओ, फ्लोरिडा, टेक्सास आणि उत्तर कॅरोलिना यासारख्या प्रांतांमध्ये चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्यांना व्हाईट हाऊसचा प्रवास सहज सुकर झाला.

नव्या अमेरिकेची निर्मिती करणार
राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मुख्यालयात जमलेल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, अमेरिकेला खर्‍या अर्थाने आणि मजबूत महासत्ता करण्यासाठी देशाचा पुननिर्माण करणार आहोत. अतिशय उज्ज्वल भवितव्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. आज आहे त्यापेक्षाही अधिक मजबूत अमेरिकेची निर्मिती करायची आहे. तसेच आर्थिक विकासाचा दर दुपटीने वाढवायचा आहे. यासाठी माझ्याजवळ अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.
हिलरी क्लिटंन यांनी अमेरिकेची भरपूर सेवा केली. त्यांनी मला अतिशय कडवी टक्कर दिली. मी त्यांचा आभारी आहे. मी सर्व अमेरिकन नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष आहे. हा विजय अमेरिकेवर प्रेम करणार्‍या लोकांचा आहे. माझा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे या स्पर्धेत टिकाव धरणे माझ्यासाठी फार कठीण होते. राजकारण खरोखरच सोपे नाही. मी सर्वांनाच सोबत घेऊन काम करणार आणि प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. सर्वांशीच मैत्री करणार, कोणीही शत्रू राहणार नाही. प्रत्येक देशासोबत चांगले संबंध प्रस्थापित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या विजयात माझ्या परिवारातील लोकांचाही मोठा सहभाग आहे. आई, वडील, पत्नी लारा आणि मुलगा आणि इतर सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो, असेही ते म्हणाले.

अबकी बार ट्रम्प सरकार!
डोनॉल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे अनुकरण करीत ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा नारा दिला होता. अमेरिकेत राहणार्‍या अनेक भारतीयांना त्यांचा हा नारा आवडला होता. विशेष म्हणजे, मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार मोदी सरकार’ असा नारा दिला होता आणि तो प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

अमेरिकेतील भारतीयांचा विशेष आभारी : एरिक ट्रम्प
डोनॉल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प याने आपले वडील डोनॉल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी अमेरिकेतील भारतीयांचे विशेष आभार मानले आहे. ट्रम्प यांच्या या ऐतिहासिक विजयात भारतीयांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांचा मी मनापासून आभारी आहे, अशी प्रतिक्रिया एरिक यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे निवडणुकीतील नेत्रदीपक विजयाबद्दल अभिनंदन केले. द्विपक्षीय संबंध व सहकार्य आणखी विस्तारित करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्यासाठी भारत इच्छूक आहे. आपल्या निवडणूक प्रचारात तुम्ही भारताशी मैत्रीचे नाते घट्ट करण्याची हमी दिली होती, ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त कले.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1453 of 1765 articles)

  nitin-gadkari1
  ♦११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यत सवलत ♦नितीन गडकरी यांच्या निर्णयामुळे जनतेला दिलासा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] - ५०० आणि एक ...