Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » तेजस्वी यादवांना ४४ हजार तरुणींचा लग्नाचा प्रस्ताव!

तेजस्वी यादवांना ४४ हजार तरुणींचा लग्नाचा प्रस्ताव!

tejaswi-yadavपाटणा, [२१ ऑक्टोबर] – राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत लग्न करण्यासाठी तरुणी जणू उतावीळ झाल्या आहेत. तेजस्वी यादव यांना एक-दोन नव्हे तर चक्क ४४ हजारांपेक्षा जास्त तरुणींनी लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. हे सर्व प्रस्ताव सरकारी व्हॉट्सऍप नंबरवर प्राप्त झाले आहेत.
नागरिकांचे रस्त्यांबाबतचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बिहार सरकारने एक व्हॉट्सऍप क्रमांक जारी केला होता. मात्र, यावर रस्त्याच्या तक्रारी कमी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी लग्नाचे प्रस्तावच जास्त आले आहेत.
या क्रमांकावर तेजस्वी यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवताना तरुणींनी आपले वय, रंग, उंची आणि इतकेच नाही तर फिगरची माहिती पाठवताना आपली राजकीय महत्त्वाकांक्षाही लपवून ठेवलेली नाही, तर काही तरुणींनी आपल्याशी लग्न केल्यावर काय राजकीय फायदा मिळेल, हे पटविण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व प्रस्ताव पाहून तेजस्वी यादव मात्र चांगलेच बुचकाळ्यात सापडले आहेत.
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप हे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि विशेष म्हणजे, दोघेही अविवाहित आहेत. बिहारमध्ये या दोघांच्या लग्नाची नेहमीच चर्चा होत असते.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

   व्हिडीओ संग्रह

   मागील बातम्या, लेख शोध

   Search by Date
   Search by Category
   Search with Google