Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दिवाळी तिकीट जारी करण्यात २० देशांचा सहभाग!

दिवाळी तिकीट जारी करण्यात २० देशांचा सहभाग!

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क,३० नोव्हेंबर –
uno-united-nations-buildingसंयुक्त राष्ट्रसंघाने दिवाळीला आंतरराष्ट्रीय मान्यता दिल्यानंतर अमेरिकेतर्फे दिवाळीवर विशेष टपाल तिकीट जारी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, यात फ्रान्स आणि ब्रिटन या दोन सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य राष्ट्रांसह एकूण २० देश सहभागी झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात बेलारस आणि भारताने संयुक्तपणे या मोहिमेचे आयोजन केले आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या सभागृहात दिवाळी टपाल तिकिटाचे विमोचन करण्याच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पॅलेस्टाईनचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
दिवाळी या भारतीय राष्ट्रीय सणाच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या टपाल खात्याने तिकीट जारी करण्यापूर्वी, या उद्देशासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत असलेले दिवाळी तिकीट प्रकल्पाचे अध्यक्ष रंजू बत्रा यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, दिवाळी तिकिटाचे औपचारिक विमोचन करण्यात आले नसले, तरी आतापर्यंत १ लाख ७० हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (983 of 1570 articles)


    तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर - भाजपाच्या सर्व खासदारांनी आणि आमदारांनी आपल्या बँक खात्याचा तपशील जाहीर करावा, असे आवाहन ...