Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » दोन हजाराची नोट काळा पैसा कसा रोखणार?

दोन हजाराची नोट काळा पैसा कसा रोखणार?

=राहुल गांधी यांचा सवाल=
rahul-gandhi3नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] – चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या अचानक हद्दपार करून दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज टीका केली. दोन हजार रुपयांची नोट काळा पैसा कसा रोखणार आहे, यावर त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.
ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, त्यांनी त्यावर घट्ट बैठक मांडली आहे आणि शेतकरी, लहान दुकानदार आणि गृहिणी यांचे दैनंदिन जीवन गोंधळात टाकले आहे. पंतप्रधानांना देशातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, दुकानदार आणि गृहिणी यांची किती काळजी आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मी मोदी यांना केवळ एकच प्रश्‍न विचारत आहो. एक हजार रुपयांची नोट रद्द करून त्याऐवजी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याच्या निर्णयामुळे काळ्या पैशावर आळा कसा येणार आहे? असे त्यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 10 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1548 of 1817 articles)

    supreme-court_6
    नवी दिल्ली, [९ नोव्हेंबर] - अतिरेक्यांची आर्थिक नाकेबंदी करतानाच भ्रष्टाचार रोखणे व नकली नोटांचे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्यासाठी ५०० आणि १००० ...