Home » छायादालन, ठळक बातम्या, सोलापूर » धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच

धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच

  • पत्रकार तोफेल अहमद यांची टीका
  • ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन,

arun-ramtirthkar-smruti-dinज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृतीग्रंथ प्रकाशनप्रसंगी पत्रकार तोफेल अहमद, भाऊ तोरसेकर, अरुण करमरकर, शुभांगी बुवा, चंद्रिका चव्हाण, अपर्णा रामतीर्थकर
सोलापूर, [६ नोव्हेंबर] – धर्मनिरपेक्षता म्हणजे सध्या पाकिस्तानी कलाकारांना बोलावणे, सैन्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍यांना पाठीशी घालणे असा दिसून येत आहे. हिंदू महिलांच्या अधिकाराबाबत बोलणारे धर्मनिरपेक्षवादी मुस्लिम महिलांच्या अधिकाराबाबत चिडीचूप असतात. धर्मावर आधारित बेगडी धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच आहे अशी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचेअभ्यासक तुफेल अहमद यांनी केली.
ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृती समितीकडून राष्ट्रनिष्ठ या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन तुफेल अहमद आणि भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर होते. यावेळी व्यासपीठावर तरुण भारतचे माजी संपादक अरुण करमरकर, अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या. स्मृतीग्रंथाच्या प्रकाशनानंतर सेक्युलॅरिझम आणि आजची पत्रकारिता या विषयावर व्याख्यान झाले. [pullquote]पुरस्कार संपले असतील
देशातील तथाकथित बुद्धीजीवींनी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करीत पुरस्कार परत करण्याची मोहीम चालविली. ती इतकी की आता बहुधा पुरस्कार संपले असावेत असा मार्मिक टोलाही तुफेल अहमद यांनी लगावताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
♦जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय सैनिक महिलांवर बलात्कार करतात असेम्हणणार्‍या कन्हैय्याला पाठीशी घालणारे आता माजी सैनिकाच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत असे भाऊ तोरसेकर म्हणाले.[/pullquote]
अहमद म्हणाले, देशातील नीतिशकुमार, ममता बॅनर्जी,अखिलेश यादव ही आणि अशी धर्मनिरपेक्ष म्हणवणारी मंडळी पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावतील. परंतु तस्लीमा नसरीन, वहिदा रहेमान यांना मात्र बोलावणार नाहीत. भारतात पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला असा सवालही अहमद यांनी उपस्थित केला. भारतीय समाजात भेदभाव निर्माण करण्यासाठी अल्पसंख्यांकवादाची निर्मिती झाली. परंतु अल्पसंख्याक
वादामुळेच मुस्लिम समाजाच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाज जर अल्पसंख्यांकवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडला तर या समाजाची प्रगती होऊ शकते. केवळ संख्येवरून अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशी वर्गवारी करता येणार नाही. ख्रिश्चन, शीख, जैन हे ही देशात अल्पसंख्य आहेत. परंतु त्यांना अल्पसंख्याकाच्यादृष्टीने पाहिले जात नाही, असे अहमद म्हणाले.
भाऊ तोरसेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा उद्देश आणि शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा उद्देश यात मोठा फरक आहे. मोदींना ही जबाबदारी आपल्या खांद्यावर का घ्यावीशी वाटली हे जाणून घेणेमहत्त्वाचे आहे. २०१४ साली वृत्तवाहिन्यांनी रालोआला बहुमत मिळेल असे कुठेच दाखविले नव्हते. प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल मात्र वृत्तवाहिन्यांच्या अंदाजाच्या उलटे लागले. यावरूनच मोदी विरोधी माध्यमकर्मींच्या पत्रकारितेच्या अभ्यासाचा प्रत्यय देशाला आला, असे तोरसेकर म्हणाले.
तरुण भारताचे माजी संपादक अरुण करमरकर म्हणाले, अरुणरामतीर्थकर यांनी लोकप्रियतेसाठी कधीच लिखाण केले नाही. राष्ट्रभक्तीचे विचार त्यांच्या
लिखाणातून नेहमीच उतरत. धर्म, परंपरा, संस्कृती, राजकारण, समाजकारण यांबाबत सत्याचा मागोवा घेणारे त्यांचे लिखाण वाचकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले.
तरुण भारताचे माजी संपादक अरुण करमरकर यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी सूत्रसंचालन तर अपर्णा रामतीर्थकर यांनी आभार प्रदर्शन केले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, सोलापूर (1506 of 1764 articles)

    sharad-pawar_30
    मुंबई/नवी दिल्ली, [६ नोव्हेंबर] - मराठा स्ट्रॉंगमन अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिदीला पाच दशकं ...