रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » नगरोटा घटनेवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ

नगरोटा घटनेवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ

=कामकाज स्थगित
=शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याची विरोधकांची मागणी
=पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कॉंग्रेसने केला लोकसभेतून सभात्याग,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –
loksabha-parliamentनोटबंदीच्या मुद्यावरून आतापर्यंत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधकांनी आज नगरोटा येथील दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. लोकसभेत या मुद्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभात्यागही केला.
आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी सदस्यांनी नगरोटा रेथील लष्करी तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्यावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद  यांनी केली, त्याला अन्य पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. नगरोटा घटनेत शहीद झालेल्या तसेच बँकासमोरील रांगात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्याची मागणी विरोधी सदसयांनी केली. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याची सरकारची तयारी नसेल तर त्यांना राष्ट्रवादाचे धडे द्यावे लागतील, असे कॉंग्रेसचे राजीव शुक्ला म्हणाले. यावर नगरोटा येथे दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे, ती संपल्यानंतर शहीद जवानांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात येईल, याकडे कायदा आणि न्याय मंत्री रविशंकरप्रसाद यांनी लक्ष वेधले. विरोधी सदस्य ‘जय जवान जय किसान’च्या घोषणा देत वेलमध्ये आले. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि जदयुचे नेते शरद यादव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नगरोटाच्या मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे, असे जेटली म्हणाले. त्याचवेळी शरद यादव यांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात झालेल्या लोकांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावर नोटबंदीच्या मुद्यावर तुम्ही आधी तुमच्या पक्षात एकमत निर्माण करा, असा टोला जेटली यांनी मारला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा आहे तर शरद यादव यांचा विरोध. आमच्या पक्षात चर्चा करण्याचा सल्ला तुम्ही देता, पण पंतप्रधान तरी या मुद्यावर तुमच्यासोबत आहे का, तुमचे कोणी तुमच्या पक्षात ऐकते का, अशी प्रतिटोला शरद यादव यांनी मारला. नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना अंधारात ठेवून घेतला, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. त्या पृष्ठभूमीवर यादव यांना हा टोला जेटली यांना मारला.
सदस्य शांत होत नसल्यामुळे उपाध्यक्ष कुरियन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केले.  दुपारी १२ वाजता कामकाज सुरू होताच विरोधी सदस्य पुन्हा जय जवान जय किसानच्या घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारी २ वाजता कामकाज सुरु झाल्यावर पुन्हा गोंधळ सुरू झाला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेत गदारोळ
लोकसभेच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच  कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी नगरोटा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लष्करी अधिकारी तसेच जवानांना श्रद्धांजली वाहण्याची मागणी केली. या मुद्यावर विरोधक अतिशय आक्रमक होते. विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. सदस्यांनी आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती सुमित्रा महाजन वांरवार करत होत्या, पण सदस्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोणत्याही चकमकीत जवान शहीद होतात, तेव्हा त्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहिली जाते. पण आज अशी श्रद्धांजली का वाहण्यात आली नाही, अशी विचारणा कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी केली. शहीद जवानांचा सन्मान सरकार करत नाही, असा आरोप गांधी यांनी  केला. यावर नगरोटा येथे लष्कराची कारवाई सुरू आहे. जोपर्यंत अशी कारवाई सुरू असते, श्रद्धांजली वाहता येत नाही, ही कारवाई पूर्ण झाल्यावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येईल, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधी सदस्य ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. आपल्या मागणीवर ते अडून होते. विरोधकांची घोषणबाजी सुरूच होती, त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

देशासाठी शहीद जवानांच्या मुद्यावरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला. कॉंग्रेसला चर्चा नको आहे, तसेच सभागृहात कामकाजही होऊ द्यायचे नाही, असा आरोप नायडू यांनी केला. देशासाठी शहीद होणार्‍या जवानांच्या मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन नायडू यांनी केले. सरकार आपली मागणी मान्य करत नाही हे पाहून  विरोधी सदस्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. विरोधी पक्षांनी सभागृहात होणार्‍या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन करत सरकारजवळ लपवण्यासारखे काही नाही, असे नायडू म्हणाले. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाल्यावर सकाळी करण्यात आलेला सभात्याग अध्यक्षांच्या विरोधात नव्हता, तर सरकारच्या विरोधात होता, असा खुलासा कॉंग्रेसचे गटनेते खडगे यांनी केला.  नोटबंदीच्या मुद्यावर चर्चा व्हावी अशी आमची भूमिका आहे. नोटबंदीमुळे जो त्रास जनतेला होत आहे, त्याकडे आम्हाला सरकारचे लक्ष वेधायचे आहे. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे नियम ५६ नुसारही चर्चा करू नका आणि सरकारच्या आग्रहाप्रमाणे नियम १९३ नुसारही चर्चा घेऊ नका, कोणत्याही नियमाखाली चर्चा सुरू करा, पण त्यात मतविभाजनाची तरतूद असली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते  खडगे यांनी केली. खडगे यांच्या भूमिकेला तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी पाठिंबा दिला. सभागृहात बहुमत असतांनाही सरकार मतविभाजनाला का घाबरते, अशी विचारणा त्यांनी केली. नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त आहे, त्यामुळे सरकारने पुढाकार घेण्याची सूचना माकपचे मोहम्मद सलीम यांनी केली. याचवेळी माकपचे पी. के. बिजू खाली बसून काही कागद दाखवत होते, त्यावर सभापती महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब यांनीही चर्चेची मागणी केली. सरकार पहिल्या दिवसापासूनच या मुद्यावर चर्चेला तयार आहे, पण काळ्या पैशाच्या मुद्यावर संपूर्ण देश एक आहे, विभाजित नाही, असे दाखवण्यासाठी मतविभाजनाचा आग्रह विरोधकांनी धरू नये, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार म्हणाले. सरकारला जनतेला होणार्‍या त्रासाची कल्पना आहे, त्यामुळे सरकार चर्चेला तयार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
त्यावर शून्य तासात आपण चर्चा सुरू करू आणि कारण शून्यातूनच ब्रम्हांड निर्माण झाले, त्यामुळे आता सुरू होणार्‍या चर्चेतूनही काही चांगले निष्पन्न होईल, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी म्हटले. मात्र विरोधकांनी पुन्हा चर्चेपासून पळ काढत वेलमध्ये धाव घेत घोषणबाजी सुरू केली. त्यामुळेच नोटबंदीवर विरोधकांना चर्चा नको आहे, फक्त गोंधळ घालायचा आहे, असे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन संतप्त होत म्हणाल्या. या गोंधळातच महाजन यांनी शून्य तासाचे कामकाज सुरू केले. मात्र विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती. तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्य घोषणा देतांना हम होंगे कामयाब एक दिन हे गाणे म्हणतांनाही दिसत होते. गोंधळ शांत होत नसल्यामुळे महाजन यांनी आधी दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1658 of 2248 articles)


=लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढेल= वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू करण्यापूर्वी राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च ...