रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे…

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

नवी दिल्ली, २० जुलै – डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन,…

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत…

अणुचाचणी करू नका!

अणुचाचणी करू नका!

►अमेरिकेने पाकला देऊ केले होते पाच अब्ज डॉलर्स :…

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

►भारतीय जवानांबाबतचे वृत्त चीननेच ठरवले खोटे, बीजिंग, १९ जुलै…

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

लाहोर, १८ जुलै – गुलाम काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानपासून…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

राज्यात मान्सून सक्रिय

राज्यात मान्सून सक्रिय

►सर्वच भागात दमदार पाऊस, ►नाशिक परिसरात मुसळधार, ►शेतकरी सुखावला,…

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

►फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ►देशातील ठरले पहिलेच राज्य, मुंबई,…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून : जावडेकर

नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून : जावडेकर

=शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सरकारचा निर्धार=
javdekar-prakash-1श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – शिक्षण क्षेत्राच्या ढासळत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करतांना हा दर्जा उंचावण्यासोबतच नवीन शैक्षणिक धोरण २०१७ पासून लागू करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
६, कुशक रोड या आपल्या निवासस्थानी दै. तरुण भारतला विशेष मुलाखत देतांना जावडेकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा आता अंतिम टप्प्यात आहे. १० नोव्हेंबरला नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणावर सर्व खासदारांची भूमिका समजून घेतली जाईल. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल आणि २०१७ मध्ये देशभर नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाईल.
नवी शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करतांना देशातील सर्व राजकीय पक्षांना, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांना आणि देशातील सर्वसामान्य जनतेलाही विश्‍वासात घेण्यात आले, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, शिक्षणाचा अधिकार कायद्याने शिक्षणाचे प्रमाण तर वाढले, मात्र शिक्षणाचा दर्जा घसरला. त्यामुळे देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर आमचा भर आहे. नव्या धोरणात शिक्षण क्षेत्रात संशोधनावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे.
इंग्रजांच्या काळातील शिक्षण पद्धती मर्यादित हेतू डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली होती, त्यामुळे आपल्या समाजव्यवस्थेत ती अपयशी ठरली, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणातून मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर तसेच त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्यासोबतच त्याच्या आर्थिक विकासालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
सवार्र्ना शिक्षण, चांगले शिक्षण, शिक्षणाची समान संधी, आवाक्यातील शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचे उत्तरदायित्व निश्‍चित करणे या ५ प्रमुख सूत्रांवर नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया राहणार आहे, असे नमूद करत जावडेकर म्हणाले की, आज शिक्षणावर सरकार सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.५ टक्के खर्च करत आहे. केंद्र सरकार शिक्षणावर १५ टक्के, तर राज्य सरकार २० टक्के खर्च करत आहे. ही राशी कमी नाही.
उच्च शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून १ हजार कोटी रुपयांच्या भागभांडवलातून उच्च शिक्षण अर्थिक प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयापर्यंत निधी उभा केला जाऊ शकतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ, महाविद्यालये तसेच शाळा महाविद्यालयांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकली आहेत, त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल, असे स्पष्ट करत जावडेकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप कमीतकमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शैक्षणिक दर्जा चांगला असलेल्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याचा आमचा संकल्प आहे. मात्र ज्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा चांगला नाही, त्यांना त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेला हस्तक्षेप आणि नियंत्रण सरकार ठेवणार आहे.
मी इस्राएलला गेलो असता तेथील सर्व शिक्षण इंग्रजीत नाही, तर त्यांच्या हिब्रु या भाषेत उपलब्ध असल्याचे मला आढळून आले, त्यामुळे भारतातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेपासूनचे सर्व शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून देण्याची सरकारची भूमिका आहे. सर्व शाखांचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राने पुढाकार घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
कुलगुरुंना ओलिस बनवणे निषेधार्ह
शिक्षण क्षेत्रात राजकारण वाढत असल्याबद्दल प्रकाश जावडेकर यांनी तीव्र खंत व्यक्त केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि अन्य अधिकार्‍यांना ओलिस धरल्याच्या घटनेचा जावडेकर यांनी निषेध केला. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावले होते, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार्‍या कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी रात्रभर बंधक बनवून ठेवले, हे योग्य नाही, असे जावडेकर म्हणाले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2138 of 2221 articles)


नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] - भाजपातून बाहेर पडून नवा पक्षात, आपल्या नव्या डावाची सुरूवात करण्यास धडपडणार्‍या नवज्योत सिंग सिद्धूला सध्या ...