प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय

►साडेसात लाख ‘हॉटस्पॉट’ बसविणार ►केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय, नवी…

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

अल्लाशिवाय इतरांची पूजा करणारे मुस्लिम नाही!

►•देवबंदचा आणखी एक फतवा, लखनौ, २१ ऑक्टोबर – मुस्लिम…

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

म्हणून निवडणुकीची घोषणा नाही

►मुख्य निवडणूक आयुक्तांचे गुजरातबाबत स्पष्टीकरण, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर…

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही

►अमेरिकी प्रशासनाची भूमिका, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – पाकिस्तान…

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

दोन वर्षांपासून बेपत्ता पाक पत्रकार सापडली

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर – मागील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली…

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

पाकिस्तानच्या टेहळणीसाठी भारताची मदत शक्य : अमेरिका

वॉशिंगटन, १८ ऑक्टोबर – आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर…

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त

►शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरू ►मुख्यमंत्री फडणवीस यांची…

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

राज्यातील एसटी-संपावर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई, १८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने…

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव

►५ कोटी रुपये राखीव किंमत, मुंबई, १८ ऑक्टोबर –…

महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे | आपण महासत्ता…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

दुमदुमले भारतमाता गौरव गान…

॥ तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश…

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

मोदीजी, अभी नही, तो कभी नही!

॥ विशेष : सोमनाथ देशमाने | अयोध्येत राम जन्मभूमीवर…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नव्या नोटा पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न!

नव्या नोटा पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न!

♦वायुदलाचे ‘ग्लोबमास्टर’ सज्ज
♦जुन्या नोटा वापरण्याची मुदत १० दिवसांनी वाढविली
♦सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आणखी चार दिवस टोलमाफी
♦नाशिक प्रेसमध्ये ५०, १०० च्या ३५ लाख नोटा छापून तयार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली/मुंबई, १४ नोव्हेंबर –
globmaster_aircraftबँकांमधील चलनाच्या तुटवड्यामुळे देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, त्याविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आवश्यक असलेल्या नवीन नोटा बँकांपर्यंत पोहचविण्यासाठी आता भारतीय हवाई दलाच्या ‘ग्लोबमास्टर’ विमानांची मदत घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आणखी चार दिवस टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.
नवीन नोटांमुळे लवकरच चलन तुटवडा दूर होऊ शकतो. मात्र, या नोटा बँका आणि एटीएम केंद्रांपर्यंत त्वरित पोहोचवण्याची गरज आहे. त्यामुळेच ‘मुद्रणालय ते बँका’ हा पल्ला गाठण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने कामही सुरू झाले असून, हवाई दलाचे ग्लोबमास्टर हे विमान आणि काही हेलिकॉप्टर्स नोटवाहतुकीसाठी वापरले जात आहेत.
सध्या नाशिकच्या मुद्रणालयात नोटांची छपाई सुरू करण्यात आली आहे. पाचशे रुपयांच्या नोटेसोबतच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटांची छपाई नाशिकच्या मुद्रणालयात सुरू आहे. ५० आणि १०० रूपयांच्या सुमारे ३५ लाख नोटा छापून तयार झाल्या आहेत. नाशिकसह म्हैसूरच्या मुद्रणालयातही नोटांची छपाई सुरू आहे. रिझर्व्ह बँकेला पाचशे रुपयांच्या ५० लाख नोटा रविवारीच पाठविण्यात आल्या होत्या.
‘ग्लोबमास्टर’ विमानांद्वारे नोटा
नवीन नोटा पोहोचविण्यासाठी हवाई दलाच्या पाच ग्लोबमास्टर मालवाहू विमानांची मदत घेतली जात आहे. म्हैसूर प्रेसमधून ही विमाने त्या-त्या क्षेत्रात पैसे पाठवणार आहेत. तीन ‘ग्लोबमास्टर’ विमानांद्वारे नोटा येणार आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

१८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी
सर्व राष्ट्रीय महामार्गांवर १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीची मुदत वाढविण्यात आली आहे. जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्‌ट्या पैशांची अडचण असल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी चार दिवस केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामार्गावर टोल भरण्याची गरज राहणार नाही. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल सवलत जाहीर केली होती. मात्र, चलन तुटवड्यामुळे या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

येथे वापरता येतील ५०० व हजारच्या जुन्या नोटा
५०० व हजारच्या जुन्या नोटा नोटा वापरण्याची मुदत आज सोमवारी मध्यरात्री संपणार होती. पण चलन तुटवडयामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही मुदत वाढविली. या जुन्या नोटा रद्द करताना, त्यावेळी काही अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. आता दहा दिवस मुदत वाढविल्याने सरकारी दवाखाने, खासगी मेडिकल दुकाने, खासगी वीज कंपन्यांच्या बिलांचा भरणा, पाण्याची बिले, गॅस सिलेंडर दुकाने, रेल्वेस्थानके, विमानतळ, दूध केंद्रे, सहकारी बाजार, स्मशानभूमी येथे जुन्या नोटा वापरता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी ही माहिती बैठकीनंतर माध्यमांना दिली.

अहोरात्र झटत आहेत कर्मचारी आणि कामगार
एटीएममध्ये बदल करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले असून, दोन लाख बँक कर्मचारी त्यासाठी झटत आहेत. नोट छपाईसाठी कामगारही अतिशय मेहनत घेत आहेत. याची दखल घेत सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2425 of 2816 articles)


♦नेटवर्क आणखी मजबूत करणार ♦नोटा काढण्याची मर्यादाही वाढवली, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर - देशभरात नोटा काढण्यासाठी बँकांमध्ये होत असलेली ...