जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

जमिनीसोबतच समुद्रातील हालचालींवरही कार्टोसॅटची नजर

►बहुतांश उपग्रह पृथ्वीपासून जवळच्याच अंतरावर, नवी दिल्ली, २६ जून…

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवे शिक्षण धोरण समितीच्या अध्यक्षपदी कस्तुरीरंगन

नवी दिल्ली, २६ जून – नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा…

अडवाणींची स्वत:हून माघार

अडवाणींची स्वत:हून माघार

►चिन्मयानंद यांची माहिती, नवी दिल्ली, २५ जून – भाजपाचे…

माझे सरकार निष्कलंक

माझे सरकार निष्कलंक

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, वॉशिंग्टन, २६ जून – माझ्या…

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘ड्रंकर ड्रायव्हर्स’ची नावे!

क्विन्सटाऊन, २६ जून – न्यूझीलंडमध्ये मद्यपानाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍या…

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

पंतप्रधानांचे अमेरिकेत शाही स्वागत

►आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार • •►‘मोदी, मोदी’च्या घोषणांनी…

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, पण समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

►शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घतले नाही तर बघतो!, नाशिक, २५…

शेतकर्‍यांचे चांगभले!

शेतकर्‍यांचे चांगभले!

►३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी ►देशाच्या इतिहासातील सर्वात…

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद संदीप जाधव, श्रावण मानेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद/कोल्हापूर, २४ जून – पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद…

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

नव्या राष्ट्रपतींची चाहुल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मोदी या निवडणूकीसाठी…

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

रामनाथ कोविंद : समाजचिंतक ते राष्ट्रपती

योगिता साळवी | सत्ताधारी पक्षात राज्यपाल कुणाला बनवावे या…

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

स्वतंत्र गोरखालँडची मागणी

प्रा. अविनाश कोल्हे | गोरखा समाजाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 05:56 | अस्त: 19:02
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नाशिकमधून एक हजार कोटींच्या नोटा रवाना

नाशिकमधून एक हजार कोटींच्या नोटा रवाना

वृत्तसंस्था
पणजी, १६ नोव्हेंबर –
Use of inks in banksचलनविषयक परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिक मुद्रणालयातून १ हजार कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे रवाना  करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चलन तुटवट्यावर बँकांना दिलासा मिळण्याची  शक्यता आहे. पाचशे रुपयाच्या १.३ कोटी आणि शंभर रुपयांच्या ३.१ कोटी नोटा आरबीआयकडे पाठविण्यात आल्या आहेत. वीस रुपयांच्या ३ कोटी नोटांचीही खेप रवाना करण्यात आली आहे.
रांगा कायम
५०० व हजारच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर, एटीएम  केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहाटेपासूनच लागत आहेत. आठवडा लोटूनही दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची चणचण होत असल्याने बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा वाढत आहेत. गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी बँका बंद होत्या. त्यामुळे  मंगळवारची सकाळ उजाडताच नागरिकांच्या  रांगा बँकांसमोर लागल्या. आज बुधवारीही हे चित्र कायम होते. काही ठिकाणी रांगेत घुसखोरी, बँक कर्मचार्‍यांसोबत वाद, असे  प्रकार घडले. आपला क्रमांक पहिला लागण्यासाठी रात्रीपासून खातेदार बँकांबाहेर रांग लावत आहेत. नवी दिल्लीतील अर्थ मंत्रालय आणि संसद भवनातील एटीएम केंद्रांपुढेही मोठी रांग होती. मुंबईतील मालाडमधील ९० टक्के एटीएममध्ये खडखडाट होता.
दोन वृद्धांचा मृत्यू
नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला. दिगंबर कसबे असे हे ७० वर्षांचे गृहस्थ नांदेडमधील बँक ऑफ इंडियाच्या तुपा शाखेत पैसे बदलण्यासाठी आले होते. मात्र बँकेबाहेर रांगेत उभे असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. रांगेतील लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला,  मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने दिगंबर कसबे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत  आहे. मुंबईतील मिरा-भाईंदर येथे नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरील रांगेत आणखी एका वृद्धाचा मृत्यू  झाला. दीपकभाई शाह असं मृत  व्यक्तीचं नाव असून ते ६० वर्षांचे होते. वसईतील कॅथॉलिक बँकेबाहेर ही घटना घडली. दीपकभाई शाह आज बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभे होते. मात्र सकाळी ११  वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते तिथेच कोसळले. यानंतर  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

मूळ ओळखपत्राच्या प्रतींची गरज नाही
नवी दिल्ली – बँक कर्मचार्‍यांनी नोटा बदलून देताना ग्राहकांकडून त्यांच्या  ओळखपत्राची  प्रत घेण्याची गरज नाही, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. पुरावा म्हणून ओळखपत्राची मूळ प्रत दाखवल्यानंतर त्याची झेरॉक्स प्रत बँकेने घेण्याची गरज नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ओळखपत्राची प्रत जमा करताना बँकांबाहेरील गर्दी अधिक प्रमाणात वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरबीआयने दिलेला अर्ज आणि मूळ ओळखपत्र तपासणे एवढेच कार्य बँकांनी करायचे आहे, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

‘कार्ड स्वॅप मशिन’ची मागणी वाढली
नवी दिल्ली – पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर ग्राहकांकडून डेबिट आणि क्रेडिटकार्डचा वापर वाढल्याने या कार्डच्या वापरासाठी ‘कार्ड स्वॅप मशिन’ची मागणी बँकांकडे  होत आहे. रोख रकमेऐवजी कार्डच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणारा एक विशिष्ट वर्ग होता. मात्र, मागील आठवड्यापासून चलन तुटवड्यामुळे इतरही ग्राहकमंडळी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापराकडे वळली आहेत. विविध शहरातील अनेक हॉटेल, लॉज यामध्ये  कार्डच्या माध्यमातून पैसे स्वीकारले जातात. ‘कार्ड स्वॅप मशिन’ बाहेरच्या बाजारात विक्रीला उपलब्ध नसते. ते विविध व्यावसायिकांना त्यांचे खाते असलेल्या बँकेमार्फत मिळवावे लागते. प्रतिष्ठानांचे मालक आणि ग्राहक  या दोन्ही वर्गासाठी कार्डद्वारे रक्कम स्वीकारणे सोयीचे आहे. कार्ड स्वॅप मशिनमुळे थेट ग्राहकाच्या खात्यातूनच पैसे संबंधित प्रतिष्ठानच्या खात्यात जमा होतात.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1719 of 2113 articles)


=माध्यमांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही= तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्ही पुरस्कर्ते असून माध्यमांच्या कामात कधीच ...