पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

पाकी अधिकार्‌यांच्या भेटीची गरज का भासली?

►अरुण जेटली यांचा मनमोहनसिंगांना बोचरा सवाल, नवी दिल्ली, १२…

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

सी प्लेन ही वाहतूक क्षेत्रातील क्रांती

►मोदींनी प्रवास करून मुहूर्तमेढ रोवली ►नितीन गडकरी यांचा दावा,…

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

जनतेचे पैसे पूर्णपणे सुरक्षित : अरुण जेटली

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या काही दिवसांपासून सोशल…

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

विराट-अनुष्काचे इटलीत शुभमंगल

रोम, ११ डिसेंबर – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली…

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

ब्रिटनने गोठवली मल्ल्याची संपत्ती

►आठवड्याला केवळ ६७०० डॉलर्स खर्चाची मर्यादा, लंडन, ९ डिसेंबर…

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

मुस्लिमांनी केला ट्रम्प यांचा निषेध

तेल अवीव, ९ डिसेंबर – अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

विरोधकांचा दुसर्‌या दिवशीही गोंधळ

►विधान परिषदेचे काम बंद पाडले, नागपूर, १२ डिसेंबर –…

हे तर तुमचेच पाप आहे…

हे तर तुमचेच पाप आहे…

►मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, नागपूर, ११ डिसेंबर – आघाडी सरकारच्या…

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण शिफारशीची फाईल गहाळ

नागपूर, ११ डिसेंबर – प्रख्यात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा…

बात बनेगी क्या, युवराज?

बात बनेगी क्या, युवराज?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल गांधी कॉंग्रेसचे…

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

कोरियामध्ये तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी

॥ विशेष : अभय बाळकृष्ण पटवर्धन, निवृत्त कर्नल |…

जहॉं पानी कम था

जहॉं पानी कम था

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | मागल्या दोन…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अर्थभारत, ठळक बातम्या » निर्णय कटू असला तरी आवश्यक होता : रतन टाटा

निर्णय कटू असला तरी आवश्यक होता : रतन टाटा

=भविष्यातील यशाकरिताच सायरस यांना हटवले=
ratan-tata-syrus-mistryमुंबई, [१ नोव्हेंबर] – टाटा उद्योग समूहाच्या यशस्वी भवितव्यासाठीच सायरस मिस्त्री यांना समूहाच्या अध्यक्षपदावरून हटविणे भाग पडले. हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक होता, असे स्पष्टीकरण आज रतन टाटा यांनी दिले.
समूहाच्या संचालक मंडळाने संपूर्ण विचारपूर्वक आणि गंभीर होऊनच हा निर्णय घेतला आहे. तो अतिशय कटू वाटत असला, तरी समूहाच्या चांगल्या भवितव्यासाठी आवश्यक होता, अशा आशयाचे पत्र टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांनी सुमारे १०० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांना लिहिले.
सायरस मिस्त्री यांनी आज रतन टाटा आणि संचालक मंडळाने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावल्यानंतर टाटा यांनी पत्रातून आपली भूमिका विशद केली आहे.
टाटा उद्योग समूहात मला पुन्हा परतणे अनिवार्य झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या या साम्राज्यात स्थिरता कायम राखणे आवश्यक झाले होते. ज्यावेळी या समूहाला पूर्णकालिन बॉस मिळेल, त्यावेळी तो जागतिक दर्जाचाच राहील आणि आपले साम्राज्य आणखी विस्तारित होईल, असा विश्‍वास मी तुम्हा सर्वांनाच देत आहो, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
माझ्यावरील आरोप खोटे : सायरस मिस्त्री
टाटा-डोकोमो प्रकरणी मनात येतील अशा पद्धतीचे निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळेच सायरस मिस्त्री यांची टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली, या रतन टाटा यांच्या आरोपावर सायरस मिस्त्री यांनी आज मंगळवारी पलटवार केला. मी स्वत:च्या मनाने निर्णय घेतले, किंवा माझ्या निर्णयांची माहिती रतन टाटांना नव्हती, हा आरोपच खोडसाळ स्वरूपाचा आहे, असे सायरस यांनी स्पष्ट केले.
टाटा समूहातील परंपरा आणि संस्कृतीचे पालन करूनच मी टाटा-डोकोमो प्रकरण हाताळले आहेत. आता माझ्यावर अतिशय निराधार आरोप केले जात आहेत, असे सायरस यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणातील प्रत्येक निर्णय टाटा सन्स विश्‍वस्त मंडळाच्या मंजुरीतून घेण्यात आला आहे आणि प्रत्येक निर्णयाची माहिती वरच्या पातळीपर्यंत देण्यात आली होती. डोकोमोचा मुद्दा मी आपल्या व्यक्तिगत पातळीवर हाताळला, हा आरोप मी ठामपणे फेटाळून लावत असल्याचे यात नमूद आहे.
टाटा-डोकोमोमुळे जी स्थिती उद्‌भवली होती, त्यावर टाटा सन्स मंडळात विस्तृत चर्चा करण्यात आली होती. या संदर्भात जो करार झाला आहे, त्याचे टाटा समूहाने कायद्याच्या चौकटीत राहून पालन करावे, ही माझी भूमिका टाटा समूहाच्या परंपरा व संस्कृतीला अनुसरूनच होती आणि विश्‍वस्त मंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी हीच भूमिका मांडली आहे, असेही सायरस यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थभारत, ठळक बातम्या (1416 of 1555 articles)


=विमानाच्या इंधनातही वाढ= नवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] - विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत सोमवारी मोठी वाढ केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ...