Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नेपाळला भूकंपाचा धक्का

नेपाळला भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
काठमांडू, २८ नोव्हेंबर –
nepal-map1नेपाळला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती. तथापि, या धक्क्यात प्राणहानी किंवा संपत्तीहानी झाली नाही.
पहाटे पाचच्या सुमारास जमिनीच्या सुमारे १० किलोमीटर आत हा भूकंप झाला, अशी माहिती नेपाळच्या भूविज्ञान मंत्रालयातील भूकंपमापन अधिकार्‍याने दिली. एव्हरेस्ट पर्वताजवळील सोलुखुम्बू येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का बसताच लोक साखरझोपेतून जागे झाले आणि घराबाहेर आले. मध्य आणि पूर्व नेपाळच्या अनेक भागांनाही भूकंपाचा धक्का जाणवला.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुमारे ९ हजार नागरिकांचे बळी घेणार्‍या महाविनाशी भूकंपानंतर बसलेला हा ४७५ वा धक्का आहे. हे सर्वच धक्के चार किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे होते.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1047 of 1605 articles)


    =कपिल सिब्बल यांचे मत= वृत्तसंस्था लखनौ, २८ नोव्हेंबर - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्रातील भाजपा सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला ...