Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » नोटबंदीचे अमेरिकेनेही केले कौतुक

नोटबंदीचे अमेरिकेनेही केले कौतुक

=बेकायदेशीर पैसा बाहेर येणार=
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, १ डिसेंबर –
mark-tonerपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय महत्त्वाचा आहे. करचोरी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय अतिशय आवश्यक होता, असे अमेरिकन सरकारच्या राज्य विभागाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी म्हटले आहे.
करचोरी आणि भ्रष्टाचार यांच्या माध्यमातून तयार होणार्‍या बेकायदेशीर संपत्तीला पायबंद घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मार्क टोनर यांनी म्हटले आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना टोनर यांना भारतातील नोटबंदीविषयी प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी नोटबंदीवर भाष्य करून अमेरिकेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करणे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार, बेकायदेशीर व्यवहार रोखण्यात हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल. या निर्णयामुळे भारतीयांची आणि भारतात गेलेल्या अमेरिकी लोकांची अतिशय अडचण होते आहे. मात्र यामुळे होणारा त्रास लोकांना थोड्या दिवसांसाठी सहन करावा, असे टोनर यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकार काळ्या पैशाविरोधात पावले उचलत आहे. नोटबंदीचा निर्णय हा मोदींच्या काळ्या पैशाविरोधातील कारवाईचा भाग आहे. यामुळे कोट्यवधी रुपये दडवून ठेवणार्‍या अनेकांची पंचायत झाली आहे. मोदी सरकारकडून करचोरी करणार्‍या लोकांना चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यामधून कोट्यवधी रुपये बाहेर येतील, असा विश्‍वासही मार्क टोनर यांनी व्यक्त केला आहे.
मार्क टोनर यांनी मोदी सरकारकडून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवरही भाष्य केले आहे. मोदी सरकारकडून वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्न जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याचा लाभ घेत ६४२७५ नागरिकांकडून ६५२५० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करण्यात आले होते. याआधी गेल्या वर्षीदेखील सरकारकडून काळा पैसा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी चार हजार कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली होती. या सर्व मुद्यांचा उल्लेख मार्क टोनर यांनी आपल्या वार्तालापाच्या वेळी केला आहे.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1075 of 1678 articles)


  =कर्तव्य आणि हितसंबंधातील संघर्ष टाळण्यासाठी निर्णय= वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १ डिसेंबर - जगभर पसरलेल्या उद्योग आणि व्यवसायाच्या विशाल साम्राज्यापासून आपण पूर्णपणे ...