Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » नोटबंदीनंतर तीन दिवसांत १ लाख आयफोनची विक्री

नोटबंदीनंतर तीन दिवसांत १ लाख आयफोनची विक्री

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर –
mobile-smartphoneकेंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन दिवसांतच तब्बल एक लाख आयफोन्सची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांनी महगड्या वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिला. यामध्ये सोने व आयफोनसारख्या वस्तूंचा समावेश होता. नोटाबंदीनंतर पहिल्या तीन दिवसांमध्येच १ लाख आयफोन्सची विक्री झाली. एरवी हे प्रमाण महिन्याला ७५ हजार असते.
आयफोन ७ व आयफोन ७ प्लसची किंमत साधारणतः साठ हजार ते ९२ हजार रुपये एवढी आहे. यामुळे आयफोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यापार्‍यांकडे जमा झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (994 of 1560 articles)


    =भारतीय वैज्ञानिकांचे अभ्यासपूर्ण संशोधन= वृत्तसंस्था कोलकाता, २९ नोव्हेंबर - मुख कर्करोगाच्या जखमा मधामुळे पूर्णपणे बर्‍या होऊ शकतात, असा अभ्यासपूर्ण शोध ...