राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींचे भाषण पक्षपाती; कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, २६ जुलै – देशाचे १४ वे राष्ट्रपती…

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

‘त्या’ पाच जवानांची जन्मठेप रद्द

►माछिल चकमक प्रकरण ►सशस्त्र दल लवादाचा निर्णय, नवी दिल्ली,…

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

सैन्याला पूर्ण मोकळीक द्या

►वीरमाता तृप्ता थापर यांचे आवाहन, नवी दिल्ली, २६ जुलै…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » नोटबंदीने सातव्या दिवशीही संसदेची कोंडी

नोटबंदीने सातव्या दिवशीही संसदेची कोंडी

=पंतप्रधानांकडून माफीची विरोधकांची मागणी=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर –
sansad1नोटबंदीच्या मुद्यावरून विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग सातव्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीला विरोध करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारेवर धरल्यानंतर विरोधक अधिकच संतप्त झाले असून, पंतप्रधानांनी विरोधकांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सरकारने मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावली. शनिवार आणि रविवार असे दान दिवस सुटी आली असल्याने संसदेचे कामकाज आता सोमवारीच सुरू होणार आहे.
कॉंगे्रस, तृणमूल कॉंगे्रस. समाजवादी पार्टी, बसपा आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला.
आज सकाळी एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना, सर्वसामान्यांच्या अडचणींमुळे नव्हे, तर सरकारने विरोधकांना त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी कुठलाही वेळ न देता नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्याने ते या निर्णयाला विरोध करीत आहेत, असा चिमटा काढला होता. पंतप्रधानांचे हे वक्तव्य विरोधकांच्या जिव्हारी लागले असल्याचेच दिसून येत आहे.
राज्यसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर दिवंगत सदस्य दीपेन घोष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बसपा नेत्या मायावती यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. विरोधकांजवळ काळा पैसा आहे, हा पंतप्रधानांचा आरोप खोटा असून, यासाठी त्यांनी आमची माफी मागावी, अशी मागणी मायावती यांनी केली.
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही आपला संताप व्यक्त केला. सर्व विरोधक काळ्या पैशाच्या विरोधात आहेत, हे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी सभागृहातील चर्चेत स्पष्ट केले असताना पंतप्रधान मोदी अशा प्रकारचा आरोप कसा करू शकतात, असा सवाल आझाद यांनी केला. आमचा आधीपासूनच काळ्या पैशाला विरोध असल्याने पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. त्यांनी आमची मागायलाच हवी, असे आझाद म्हणाले. यावेळी विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेत धाव घेतली आणि ‘प्रधानमंत्री माफी मांगो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. भाजपा सदस्यांनीही विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला आणि पंतप्रधान माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली. या गोंधळात सुरुवातीच्या दोन तहकुबीनंतर उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
लोकसभेतील गोंधळाचे चित्रही यापेक्षा वेगळे नव्हते. नोटबंदीच्या निर्णयाला विरोध कायम ठेवताना कॉंगे्रससह सर्व विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. या सभागृहातही पंतप्रधानांच्या काळ्या पैशावरील वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. सतत दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. पण, त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने सभापती सुमित्रा महाजन यांनी अखेर दिवसभरासाठीच कामकाज तहकूब केले.

प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न
लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतील एका व्यक्तीने आज शुक्रवारी सभागृहाच्या चेम्बरमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, तिथे साध्या गणवेशात असलेल्या पोलिसांनी तो हाणून पाडला.
राकेशसिंह बघेल असे या युवकाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. नोटबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर सभापती सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज ४० मिनिटांसाठी तहकूब केले. यानंतर सदस्य सभागृहाबाहेर जात असताना, काही सदस्यांचे लक्ष प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या युवकाकडे गेले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्याला पकडून बाहेर काढले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1739 of 2254 articles)


=दोन भारतीय जवान शहीद= वृत्तसंस्था श्रीनगर, २५ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपूरा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार ...