ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

ब्राह्मोसची चाचणी यशस्वी

►जमीन, समुद्र तसेच हवेतून मारा करता येईल अशी जगातील…

नवीन वेतन धोरणाला मंजुरी

नवीन वेतन धोरणाला मंजुरी

►अरुण जेटली यांची माहिती, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –…

मंत्री, मुख्यमंत्री व भाजपा नेत्यांना जैशकडून धोका

मंत्री, मुख्यमंत्री व भाजपा नेत्यांना जैशकडून धोका

►गुप्तचर यंत्रणांची माहिती, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील…

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

मुगाबेंची ३७ वर्षांची राजवट संपली

►अध्यक्षांचा अखेर राजीनामा, हरारे, २२ नोव्हेंबर – झिम्बाब्वेच्या संसदेत…

चीनची उत्तर कोरियाच्या उड्‌डाणांवर बंदी

चीनची उत्तर कोरियाच्या उड्‌डाणांवर बंदी

बीजिंग, २२ नोव्हेंबर – चीनने उत्तर कोरियाच्या सर्व उड्‌डाणांवर…

चीन, उ. कोरियाच्या १३ कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

चीन, उ. कोरियाच्या १३ कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन, २२ नोव्हेंबर – अमेरिकेने चीन आणि उत्तर कोरियातल्या…

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

२ कोटी २० लाखांचे अवैध कीटकनाशक व खत जप्त

►कृषी आयुक्तालयाची कारवाई ►कंपन्यांवर फौजदारी गुन्हे, मुंबई, २२ नोव्हेंबर…

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

परीक्षा शुल्कासह निर्वाह भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होणार

►२०१७-१८ च्या पहिल्या सत्रासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, २१ नोव्हेंबर…

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

मला फाशी नको, जन्मठेप द्या!

►कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याची विनवणी, अहमदनगर,…

‘भारते नवजीवनम्’

‘भारते नवजीवनम्’

संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम ॥ विशेष :…

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

मोदीजी, रुद्रावतार दाखवा हो!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जाती-पातीच्या राजकारणाला, छद्मी…

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

जीएसटी आणि समाजाची मानसिकता

॥ विशेष : ॠषिकेश बदामीकर | आपण जसे आपले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:38 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » नोटांवर बंदी हे स्वच्छता अभियानच : मोदी

नोटांवर बंदी हे स्वच्छता अभियानच : मोदी

⇒काळा पैसा धारकांची मुळीच गय नाही
⇒आणखी कठोर कारवाईचे पंतप्रधानांचे संकेत
⇒प्रामाणिक नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही,

Kobe: Prime Minister Narendra Modi addressing members of Indian community at Kobe Museum in Kobe on Saturday. PTI Photo by Shirish Shete(PTI11_12_2016_000063B)

कोबे, [१२ नोव्हेंबर] – ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा आपल्या सरकारचा निर्णय स्वच्छता अभियानाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात त्रास झाला असला, तरी तमाम भारतीयांनी त्याचे स्वागत केले आहे. काळा पैसा जवळ बाळगणार्‍या लोकांची माझे सरकार मुळीच गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा देतानाच, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे कठोर पाऊल उचलण्यात येईल, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे दिला.
पंतप्रधान मोदी सध्या जपानच्या दौर्‍यावर असून, ते येथे अनिवासी भारतीयांतर्फे आयोजित स्वागत संमारंभात बोलत होते. प्रामाणिक नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा घामाचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे, याची हमी मी पुन्हा एकदा देत आहे. सरकारने मोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर धनाढ्य कुटुंबातील अनेकांनी त्यांच्या घरातील महिला सदस्यांच्या नावावर दोन ते अडीच लाख रुपये जमा केले आहेत. यामुळे गृहिणींचा मोठा फायदाच झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
सध्या देशभरातील बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे आणि या सर्वच घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष आहे. अनेक लोक रस्त्यावर, कचरापेटीत पैसे फेकत आहेत आणि आता तर चक्क गंगा नदीतही हजारच्या नोटा तरंगताना दिसत आहेत, असे सांगताना, त्रास होऊनही सर्वसामान्यांनी हा कटू निर्णय आनंदाचे स्वीकारला. अनेकांकडून मला आशीर्वाद मिळत आहे.
मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी स्वच्छता अभियानाची घोषणा केली होती. यात केवळ देश स्वच्छ करण्याच्या संकल्पनेचा अंतर्भाव नव्हता, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा डागही स्वच्छ करण्याचा समावेश होता. सुरुवातीला आम्ही काळा पैसा बाळगणार्‍यांना बरीच मुदत दिली. ती संपल्यानंतरही अनेकांकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा असल्याचे लक्षात आले आणि तो पैसा कचरा ठरविण्यासाठी आम्ही हा धाडसी निर्णय घेतला. यापुढेही असे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या प्रक्रियेत ज्यांचा काळा पैसा बाहेर येईल, त्यांना सोडणार नाही. जे लोक मला चांगले ओळखतात, ते अतिशय हुशार आहेत. कारण, त्यांनी हा पैसा चक्क गंगा नदीत अर्पण करण्याचा मार्ग निवडला आहे, असे पंतप्रधानांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली.

देशवासीयांना नमन
कडक थंडीत सकाळपासून देशभरातील बँक शाखांमध्ये लोक रांगेत उभे राहतात आणि आपल्याजवळील नोटा बदलून घेतात. इतका त्रास होत असतानाही माझ्या सरकारचा निर्णय देशहितात असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांना मी मनापासून नमन करतो. मला त्यांचे अशा प्रकारे आशीर्वाद प्राप्त होतील, असा विचारही मी केला नव्हता, असेही पंतप्रधान म्हणाले. अनेकांच्या घरी लग्न आहे, कोणी आजारी आहेत. ते देखील आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. पण, दुसरीकडे निर्णयाचे स्वागतही करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1583 of 1922 articles)


=केंंद्र सरकारची ग्वाही= नवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] - देशातील बाजारपेठा आणि दुकानांमध्ये मिठाचा तुटवडा असल्याच्या अफवांचे केंद्र सरकारने आज शनिवारी ...