Home » आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, छायादालन, ठळक बातम्या » न्यूझीलंडमधील भूकंपात समूद्राचा मोठा भाग गायब!

न्यूझीलंडमधील भूकंपात समूद्राचा मोठा भाग गायब!

वृत्तसंस्था
वेलिंग्टन, १९ नोव्हेंबर –

याच आठवड्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या समूद्र किनारपट्टीच्या  भागात झालेल्या ७.२ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने समुद्राचा काही भागच गायब झाला आहे. या अकल्पित आणि अद्‌भूत घटनेमुळे जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञांचे लक्ष सध्या न्यूझीलंडकडे वेधून घेतले आहे.
रिश्टर स्केलवर ७.२ इतकी तीव्रता असलेल्या भूकंपाने सोमवारी न्यूझीलंडचा बहुतांश भाग हादरला होता. केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी असल्याने त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला होता. या भूकंपाच्या दोन ते तीन दिवसांतच चक्क समूद्राला उभी भेग पाडत सात फूट उंचपर्यंत जमीन प्रकट झाली आहे. समूद्रतळाखाली असलेल्या शंख- शिपल्यांच्या विश्‍वाला आता आभाळाचे छत मिळाले आहे. शेवाळ आणि जलपर्णी असे अद्‌भूत चित्र या भागात पाहायला मिळत आहे, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली.
या भूकंपाने केवळ समूद्रालाच गिळंकृत केले नाही, तर काही ठिकाणची जमीनही गायब झाली आहे. काईकुरा बेटाजवळील या भूकंपानंतर आजूबाजूची जमीन गायब झाली. वैज्ञानिकांच्या मते, हा भूकंप सुमारे ४०० अणुबॉम्बच्या स्फोटाच्या क्षमतेइतक्या हादर्‍यांचा होता.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, छायादालन, ठळक बातम्या (1238 of 1700 articles)


    =तज्ज्ञांचे मत= वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर - ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ...