Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » पंकजा मुंडे यांनी बालगृहात साजरी केली भाऊबीज

पंकजा मुंडे यांनी बालगृहात साजरी केली भाऊबीज

pankaja-mundeतभा वृत्तसेवा
मुंबई, [१ नोव्हेंबर] – बहीण-भावाचे नाते अधिक दृढ करणार्‍या भाऊबीजेच्या दिवशी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माटुंग्याच्या एका बालगृहात भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी बालकांच्या सानिध्यात राहून त्यांची विचारपूस केली. शिवाय, त्यांना भाऊबीजेची भेटही दिली. यावेळी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
मंत्री पंकजा मुंडे या मागील आठ वर्षांपासून अशाच प्रकारे भाऊबीजेचा सण साजरा करीत आहेत. माटुंगा येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूलच्या बालगृहाला आज दुपारी त्यांनी भेट देऊन तेथील बालकांसोबत भाऊबीज साजरी केली. बालकांना दिवाळीचा फराळ, फटाके तसेच क्रिकेट साहित्यासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यांनी बालकांशी संवाद साधला. दोन्ही ताई आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आहेत, आवडी-निवडी विचारत आहेत, हे पाहून त्या निरागस बालकांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांपासून मी राज्यातील विविध ठिकाणी वंचित, उपेक्षित, अनाथ मुलांसोबत दरवर्षी मुलाचा वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस तसेच भाऊबीज अशा प्रकारे सामाजिक जाणिवेतून साजरी करते. मला यातून आनंद मिळतो आणि प्रेरणाही मिळते. आजची भाऊबीज ही आठवणीत राहील.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1533 of 1687 articles)


    तभा वृत्तसेवा मुंबई, [१ नोव्हेंबर] - बलुचिस्थान हे प्राचीन काळात स्वतंत्र राष्ट्र होते. लोकशाही मानणारे आणि मातृसत्ताक संस्कृतीचे ते राज्य ...