Home » कलाभारत, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा द्या!

पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा द्या!

=नाना पाटेकर यांचे आवाहन=
वृत्तसंस्था
जम्मू, १६ नोव्हेंबर –
modi-nanaनोटाबंदीच्या निर्णयामुळे केवळ दहशतवाद आणि राज्यातील अस्थिरतेवरच मात होणार नाही, तर चलनात असलेल्या नकली नोटांचाही बाजार बंद होणार असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयाचे समर्थन करा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी आज बुधवारी येथे केले.
नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय स्वागतार्ह आणि क्रांतिकारी आहे. योग्य दिशेने उचलण्यात आलेले अतिशय योग्य पाऊल आहे. दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी होणार असल्याने त्यांच्या कारवायांवर मोठा आघात झाला आहे, असे नाना पाटेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
आपण सर्वसामान्य नागरिक असलो, तर देशहिताचा विचार करून १०, १५ किंवा २५ दिवस थोडा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही. काळा पैसा आणि बनावट नोटांच्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारतासारख्या मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जो त्रास सहन करावा लागत आहे, त्या तुलनेत आपल्याला होत असलेला त्रास फारच कमी आहे. काही दिवस जर आपण हा त्रास सहन केला, तर त्याचा मोठा फायदा आपल्या देशालाच मिळणार आहे असेही नानांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, नाना पाटेकर यांनी येथील सीमा सुरक्षा दलाच्या शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सीमेवरील पाकच्या गोळीबारात आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या बीएसएफ जवानांना मानवंदना दिली. जवानांवर दगडफेक करण्यासाठी येथील बेरोजगार तरुणांना फुटीरतावादी नेते ५०० ते एक हजार रुपयांच्या नोटा द्यायचे. आता या नोटांवरच बंदी आल्यानंतर दगडफेकीचे प्रकारही बंद झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानात बनावट भारतीय चलनाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जायची आणि अतिरेक्यांच्या मदतीसाठी ते नकली चलन भारतात पाठवले जायचे. यामुळे आपल्या देशात नकली नोटांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. आता हा सर्व प्रकार बंद झाला आहे, असेही नाना म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under कलाभारत, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कलाभारत, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1812 of 2239 articles)


♦मॉरिशस पंतप्रधानांनी केली प्रशंसा ♦भारताच्या अर्थव्यवस्थेला वाचविण्याचे कार्य केले वृत्तसंस्था पणजी, १६ नोव्हेंबर - ५०० व हजारच्या जुन्या नोटा रद्द ...