अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तातडीने अटक नको

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तातडीने अटक नको

►सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ►कायद्याचा प्रचंड गैरवापर, नवी दिल्ली, २०…

राज्यातील ७ मान्यवरांना पद्मपुरस्कार प्रदान

राज्यातील ७ मान्यवरांना पद्मपुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, २० मार्च – प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक…

हलक्या दर्जाचे हेल्मेट बनविणार्‍यांवर कारवाई करा

हलक्या दर्जाचे हेल्मेट बनविणार्‍यांवर कारवाई करा

►सचिनचे नितीन गडकरींना पत्र, मुंबई, २० मार्च – माजी…

इम्रानच्या ट्विटला भारतीय मुस्लिमांचे चोख उत्तर

इम्रानच्या ट्विटला भारतीय मुस्लिमांचे चोख उत्तर

कराची, २० मार्च – पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचा प्रमुख…

पुतिन चौथ्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी

पुतिन चौथ्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी

►७६.६७ टक्के विक्रमी मतांनी विजयी, मॉस्को, १९ मार्च –…

श्रीलंकेतील आणिबाणी उठली

श्रीलंकेतील आणिबाणी उठली

►भारत दौर्‍यानंतर घेतला निर्णय, कोलंबो, १८ मार्च – बौद्ध…

मुंबईत रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन

मुंबईत रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन

►पोलिसांच्या लाठीमारात ७ विद्यार्थी जखमी ►मध्य रेल्वेची वाहतूक सुरू,…

जात किंवा धर्म दहशतवाद शिकवत नाही

जात किंवा धर्म दहशतवाद शिकवत नाही

►पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन, वाशीम, १८ मार्च…

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी

►काही वस्तूंना वगळले, मुंबई, १६ मार्च – येत्या रविवारपासून…

उदात्त हिंदू संस्कृतीचा नववर्षारंभ

उदात्त हिंदू संस्कृतीचा नववर्षारंभ

॥ तरंग : दीपक कलढोणे | प्रतिवर्षी गुढीपाडवा आला…

किलबिल किलबिल पक्षी बोलती…

किलबिल किलबिल पक्षी बोलती…

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जे. कृष्णमूर्तींनी मला…

काँग्रेसचा संसदेतील पलायनवाद

काँग्रेसचा संसदेतील पलायनवाद

॥ विशेष : ल. त्र्यं. जोशी | संसदेच्या अंदाजपत्रकी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासीयांना नववर्षाची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासीयांना नववर्षाची भेट

◙गरीब जनता, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यापारी यांच्यावर सवलतींचा वर्षाव,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर –
PM Modi at book release functionनोटबंदीला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यापारी यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करीत देशवासीयांना नवीन वर्षाची आगळीवेगळी भेट दिली.
नोटबंदीच्या निर्णयाच्या घोषणेला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाचे काही प्रमाणात त्रास सहन करून, स्वागत करणार्‍या देशवासीयांना पंतप्रधान नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या आपल्या संबोधनात मोठ्या प्रमाणात रिटर्न गिफ्ट देतील, असे मानले जात होते, त्याची पूर्तता मोदी यांनी आज केली.
नोटबंदीचा निर्णय घेऊन सरकारने देशातील जनतेच्या सहकार्याने शुद्धी यज्ञ चालवला, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, काळा पैसा आणि भ्रष्टाचारामुळे देशातील जनता त्रस्त झाली होती, प्रामाणिक जनता गुडघे टेकण्यास बाध्य झाली होती, कारण यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग त्यांना दिसत नव्हता. या वातावरणामुळे त्यांचा जीव गुदमरत होता. या वातावरणातून देशवासीयांना बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला देशातील जनतेने मोठ्या हिमतीने आणि धैर्याने साथ दिली. आपल्या घरातील विकृती आणि कुप्रथांविरुद्ध लढण्याची तयारी दर्शवली
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी, या पद्धतीने देशातील  जनतेने जगून दाखवले, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, अच्छाई आणि सच्चाई याला आमच्या देशातील जनतेच्या दृष्टीने खूप महत्व आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी होणार्‍या आंदोलनात जनता आणि सरकार आमनेसामने असते, पण काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत सरकार आणि जनता खांद्याला खांदा लावून सहभागी झाली.
गेल्या काही दिवसांत आपलाच पैसा काढण्यासाठी तुम्हाला तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागले, त्रास सहन करावा, याचा उल्लेख करत, तरीसुद्धा भ्रष्टाचार आणि नकली नोटांविरुद्धच्या लढाईत तुम्ही मनापासून सहभागी झाला, याचा मोदी यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
याबाबत जनतेने माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या, आपल्या व्यथा मांडल्या, पण हे करण्यातही आपलेपणाची भावना होती, असे नमूद करत मोदी म्हणाले की, त्यामुळे आता जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्याच्या, बँकिंग व्यवस्था पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाचशे आणि हजार रुयांच्या नोटांमुळे गोरगरिबांचा हक्क हिरावला जात होता, काळा पैसा आणि महागाई वाढत होती, मुळ अर्थव्यवस्थेपेक्षा या नोटांमुळे समांतर अर्थव्यवस्था मजबूत झाली होती. त्यामुळे सरकारला या नोटा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे होणारा त्रास देशवासीयांनी सहन करत जगासमोर आदर्श उभा केला. कारण लोकांना काळा पैसा आणि भ्रष्टाचार यापासून मुक्तता हवी होती. काळा पैसा सरकार आणि समाज या दोघांसाठीही घातक ठरत होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
आपले उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त असल्याचे देशातील फक्त २४ लाख लोकच मान्य करतात. आपण आजूबाजूला पाहिले तर ही संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे आपल्या लक्षात येईल, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, हे सरकार सज्जन आणि प्रामाणिक जनतेचा मित्र आहे, तर दुर्जन लोकांना योग्य मार्गावर आणण्याच्या कामाला लागली आहे.
देशातील बेईमान लोकांबाबत कायदा आपले काम करेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असा निर्वाळा देत यात नागरिकांपेक्षा सरकारी अधिकार्‍यांची जास्त जबाबदारी असल्याचे मोदी यांनी सांगितले. प्रामाणिक माणसाला संरक्षण देणे, त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, आणि सरकार ती पार पाडेल, असे ते म्हणाले.
बदमाशी करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे गेल्या काही दिवसातील घटनाक्रमावरुन दिसून येत आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, नोटबंदीच्या काळात बँका तसेच पोस्टातील कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम केले. महिला कर्मचारीही यात मागे नव्हत्या. मात्र याच काळात काही बँक कर्मचार्‍यांनी चुकीचे काम केले. भ्रष्टाचारी लोकांचा काळा पैसा पांढरा करून देण्याचा प्रयत्न केला. अशा बँक कर्मचार्‍यांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल.
बँकांनी आपला परंपरागत प्राधान्यक्रम बदलवत आता गरीब तसेच मध्यमवर्गीयांना मदत करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, आतापर्यंत मुख्य आर्थिक प्रवाहाच्या बाहेर असलेला काळा पैसा बँकिंग पद्धतीच्या माध्यमातून पुन्हा देशाच्या आर्थिक प्रवाहात परत येत आहे, हे चांगले लक्षण आहे. हिंसेचा मार्ग सोडून देशातील तरुण पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा देशवासीयांना नववर्षाचा महानजराणा
☻तीन कोटी किसान क्रेडिट कार्डचे रूपांतर रूपे कार्डात
☻गर्भवती महिलांच्या खात्यात थेट सहा हजार
☻साडेसात लाखापर्यंतच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज
☻प्रधानमंत्री आवास योजनेत कर्जावर सूट
☻लघु उद्योगांसाठी २ कोटींपर्यंत कर्जहमी
कृषी क्षेत्र
सहकारी बँकांकडून तसेच सहकारी संस्थांकडून शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सरकारतर्फे सूट देण्यात येणार आहे. रबी पिकाच्या पेरणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे, तीन कोटी किसान क्रेडिट कार्डचे रूपांतर रूपे कार्डात सरकार करणार आहे. आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड घेऊन शेतकर्‍यांना बँकेत जावे लागायचे. या रूपांतरामुळे आता शेतकर्‍यांना कुठेही खरेदी-विक्री करता येईल.
गर्भवती महिला
देशभरातील ६५० जिल्ह्यांमध्ये गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. इस्पितळात त्यांची नोंदणी, बाळंतपण, लसीकरण आदींसाठी ६ हजार रुपयांची ही आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही मदत त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. माता-मृत्यृ दर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक
साडेसात लाखापर्यंतच्या ठेवींवर १० वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण भागांमध्ये दोन नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असून, या अंतर्गत ९ लाखापर्यंतच्या कर्जावर ४ टक्के सूट मिळणार आहे. तर, १२ लाखापर्यंतच्या कर्जावर ३ टक्के सूट मिळणार आहे. या योजनेत ३३ टक्के जास्त घरे बनविण्यात येणार असून, गावात राहणार्‍या लोकांसाठी घरांच्या नूतनीकरणासाठी २ लाखापर्यंतच्या कर्जावर ३ टक्के सूट देण्यात येईल.
लघु उद्योजक
लघु उद्योजकांसाठी सरकार २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाकरिता हमी घेणार आहे. सध्या ही हमी एक कोटी रुपयांपर्यंत होती. कॅश क्रेडिटचे प्रमाणही लघु उद्योगांसाठी २० टक्क्यांवरून वाढवून २५ टक्के करण्यात आले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?
– दोषी बँक अधिकार्‍यांना सोडणार नाही
– नागरिकांपेक्षा अधिक जबाबदारी नोकरशहांची
– प्रामाणिक व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य
– बेईमानांवर कठोर कारवाई
-‘भीम’ ऍपसोबत जुळावे!

शेअर करा

Posted by on Jan 1 2017. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2304 of 2319 articles)


◙राजकीय नाट्याला नवे वळण ◙३३ पीपीए आमदारांचा भाजपात प्रवेश, वृत्तसंस्था इटानगर, ३१ डिसेंबर - भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये आज शनिवारी एका ...