Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदी यांनी केली सोनियांच्या प्रकृतीची विचारपूस

पंतप्रधान मोदी यांनी केली सोनियांच्या प्रकृतीची विचारपूस

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर –

The Prime Minister, Shri Narendra Modi meeting the former Prime Minister, Dr. Manmohan Singh and the Congress President, Smt. Sonia Gandhi, in New Delhi

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. लोकसभेचे कामकाज आज दिवंगत सदस्य यांना श्रद्धांंजली वाहून दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मात्र सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांसह कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधी पक्ष नेत्यांची विचारपूस केली.
लोकसभेचे कामकाज सुरू व्हायला काही क्षणांचा अवकाश असतांना पंतप्रधान मोदी सभागृहात आले. सभागृहात येताचक्षणी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर मोदी विरोधी बाकांकडे वळले. गृहमंत्री राजनाथसिंह आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्यासोबत मोदी यांनी तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांची विचारपूस केली.
मोदी यांनी लोकसभेचे उपाध्यक्ष आणि अण्णाद्रमुकचे नेते एम. थम्बीदुराई यांच्याशी काही क्षण चर्चा केली. त्यानंतर मोदी सभागृहातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलले. मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधला. वाराणसी येथे कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतांना सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. जवळपास दोन महिन्यांपासून त्या गांधी सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होत्या.
राजनाथसिंह, अनंतकुमार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांशी चर्चा केली. सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यगावर मोदी यांनी भाजपा सदस्यांशीही संवाद साधला.

शेअर करा

Posted by on Nov 17 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1715 of 2099 articles)


=तरुणांसह महिलांचाही वापर= वृत्तसंस्था लातेहार, १६ नोव्हेंबर - झारखंडमधील नक्षलवाद्यांकडून ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी गावकर्‍यांचा वापर ...