Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद

=शहीद जवानाच्या शरीराचे तुकडे केले!=
nitin-subhash-koli-mandeep-singhश्रीनगर, [२९ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील माचिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सांगली येथील सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. नितीन सुभाष कोळी असे या शहीद जवानाचे नाव आहे.
नितीन कोळी यांच्यासोबत शिख रेजिमेंटचे जवान मनदीप सिंग हे देखील शहीद झाले आहेत. बुधवारी रात्रीपासून पाकचे सैनिक नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने गोळीबार करीत आहेत. भारतीय जवानही या नापाक गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देत असून, दोन दिवसांत पाकच्या १५ सैनिकांचा खात्मा करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देणार्‍या जवानांमध्ये नितीन कोळी हे देखील आघाडीवर होते ज्या लॉंग रेंज रायफलमधून ते गोळीबार करीत होता, त्यातील चेम्बरमध्ये अचानक स्फोट झाला आणि यात ते गंभीर जखमी झाले. आज लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती बीएसएफच्या अधिकार्‍याने दिली.
सांगली जिल्ह्याच्या कुपवाड येथील रहिवासी असलेले २८ वर्षीय नितीन कोळी २००८ मध्ये बीएसएफच्या सेवेत रूजू झाले होते. या सशस्त्र दलात ते हेड कॉन्स्टेबल होते. त्यांच्या मागे पत्नी व चार आणि दोन वर्षे वय असलेली दोन मुले असा परिवार आहे.
माचिलसोबतच कठुआ सेक्टरच्या अनेक भागात पाक सैनिकांकडून बेछूट गोळीबार सुरू आहे. सीमेलगतची गावे आणि लष्कर व बीएसएफच्या छावण्या पाकी सैनिकांचे लक्ष्य आहे.
शहीद जवानाच्या शरीराचे तुकडे केले!
आमच्या भूमीतील अतिरेकी आणि सैनिक यांच्यात कू्ररतेमध्ये काहीच फरक नाही, हे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शुक्रवारी रात्री पाकी सैनिकांच्या गोळीबारात शहीद झालेल्या शीख रेजिमेंटच्या एका जवानाचे पाकधार्जिण्या अतिरेक्यांनी अक्षरश: अनेक तुकडे केले.
१९९९ मधील कारगिल युद्धातही पाक सैनिकांनी अशाच प्रकारे कू्ररतेचे दर्शन जगाला घडवले होते. नियंत्रण रेषेवरील गोळीबारात वीरमरण आलेल्या या जवानाचे नाव मनदीप सिंग असे असून, पाकी गोळीबाराचे कवच घेऊन भारतीय हद्दीत दाखल झालेल्या अतिरेक्यांनी या जवानाच्या शरीराचे तुकडे करून टाकले. ते आणखी पुढे येणार होते, पण भारतीय जवानांच्या प्रखर गोळीबारामुळे त्यांना गुलाम काश्मीरकडे पळ काढावा लागला.
कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री ही भीषण घटना घडली. या अतिरेक्यांच्या गुलाम काश्मिरात परत येण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी पाकी सैनिक भारतीय हद्दीत सातत्याने गोळीबार करीत होते, अशी माहिती लष्करी अधिकार्‍याने दिली. पाकी सैनिक व अतिरेक्यांच्या या कू्ररतेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना देण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1684 of 1805 articles)


    तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] - लष्कर तसेच देशातील अन्य सुरक्षा यंत्रणाची हेरगिरी करण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ...