रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे…

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

‘राष्ट्रपती भवनात मी सामान्यांचा प्रतिनिधी’

नवी दिल्ली, २० जुलै – डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन,…

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

प्रथमच एक स्वयंसेवक रायसीनावर

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २० जुलै – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत…

अणुचाचणी करू नका!

अणुचाचणी करू नका!

►अमेरिकेने पाकला देऊ केले होते पाच अब्ज डॉलर्स :…

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

पाकी प्रसारमाध्यमेही अविश्‍वसनीयच

►भारतीय जवानांबाबतचे वृत्त चीननेच ठरवले खोटे, बीजिंग, १९ जुलै…

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

सिंध प्रांतातही आझादीचे नारे

लाहोर, १८ जुलै – गुलाम काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानपासून…

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

आता उसाला लागंल ठिबक सिंचन!

मुंबई, १८ जुलै – यापुढे जर शेतकर्‍यांना ऊस लागवड…

राज्यात मान्सून सक्रिय

राज्यात मान्सून सक्रिय

►सर्वच भागात दमदार पाऊस, ►नाशिक परिसरात मुसळधार, ►शेतकरी सुखावला,…

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

सामाजिक बहिष्कार आता गुन्हा

►फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ►देशातील ठरले पहिलेच राज्य, मुंबई,…

इतिहास घडवणारी भेट

इतिहास घडवणारी भेट

अनय जोगळेकर | इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले…

दलित की भारतीय?

दलित की भारतीय?

रमेश पतंगे | खरे सांगायचे, तर आता राजकारणातून दलित…

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

‘जमाते पुरोगामी’ बेपत्ता?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | जमाते पुरोगामीची देशातल्या…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
रवी उदय: 06:03 | अस्त: 19:01
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकिस्तानी दूतावासातील हेरगिरीचे रॅकेट उघड

पाकिस्तानी दूतावासातील हेरगिरीचे रॅकेट उघड

♦दोघांना अटक, अधिकार्‍याला देश सोडून जाण्याचे निर्देश
♦भारताने उच्चायुक्ताला बोलावून व्यक्त केली नाराजी,
Maulana Ramzan (L) and Jangir in police custudyतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – लष्कर आणि देशातील अन्य सुरक्षा यंत्रणांची हेरगिरी करणार्‍या पाकिस्तानी दूतावासातील एका रॅकेटचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यामुळे राजधानीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकार्‍याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. दोन भारतीय नागरिकांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हेरगिरीच्या या प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून समज देण्यात आली आहे.
या हेरगिरी प्रकरणी गुन्हे शाखेने महमूद अख्तर नावाच्या अधिकार्‍याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याच्या जवळून भारतीय लष्कराशी संबंधित अति गोपनीय माहितीचे दस्तावेजही ताब्यात घेण्यात आले आहे. दूतावासातील अधिकारी असल्यामुळे महमूद अख्तरला अटक करता आली नाही, त्यामुळे त्याला तातडीने देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हेरगिरी प्रकरणाचे धागदोरे पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयपर्यत पोहोचले आहेत.
या हेरगिरी प्रकरणाची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) रवींद्र यादव यांनी आज एक पत्रपरिषद घेऊन जाहीर केली. महमूद अख्तर पाकिस्तानी लष्कराच्या बलुच रेजिमेंटमध्ये होता. तीन वर्षापूर्वी त्याला आयएसआयने आपल्या सेवेत घेत भारतातील पाकिस्तानी दुतावासात तैनात करण्यात आले. याठिकाणी त्याची नियुक्ती व्हिसा विभागात करण्यात आली, जेणेकरून त्याला हेरगिरीच्या दृष्टीने माणसं हेरता येतील.
भारतीय लोकांकडून लष्कर तसेच देशातील अन्य सुरक्षा यंत्रणांबाबतची अतिगोपनीय माहिती गोळा करण्याचे काम महमूद अख्तर करायचा. यासाठी या लोकांना माहितीच्या महत्त्वाप्रमाणे दोन हजारापासून दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम देण्यात येत होती. नंतर पाकिस्तानी दूतावासामार्फत ही माहिती पाकिस्तानला पाठवली जायची. महमूद अख्तरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रारंभी आपण भारतीय असल्याचा दावा केला. यासाठी एक बनावट आधारकार्डही त्याने दाखवले. मात्र नंतर तो फुटला.
हेरगिरी प्रकरणाबाबत गुप्तचर खात्याने पोलिसांनी माहिती दिली होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून या दोघांवर पोलिस पाळत ठेवून होते. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिस या लोकांच्याही शोधात आहे. हेरगिरीच्या या प्रकरणात लष्कर आणि सीमा सुरक्षा दलातील कोणी सामील असावे आणि त्यांच्याकडूनच या दोघांना माहिती मिळत असावी, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनाही दिली.
पोलिसांनी या हेरगिरी रॅकेटची कुणकुण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी दिल्ली प्राणीसंग्रहालयाजवळ एका भारतीयाकडून संवेदनशील माहिती घेताना महमूद अख्तरला गुरुवारी रंगेहात पकडले. पोलिसांनी याप्रकरणी राजस्थानच्या नागौरचे रहिवासी असलेल्या मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड यांना अटक केली. हे दोघेही आयएसआयसाठी काम करत होते. भारतीय लष्कराच्या तैनातीबाबतची तसेच सीमा सुरक्षा दलाबाबतची अति गोपनीय माहिती, आणि नकाशे या दोघांकडून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघे नागपूरवरुन दिल्लीवरुन आले होते.
बासित यांचा उलट कांगावा
हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकार्‍याला ताब्यात घेतल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने परराष्ट्र मंत्रालयाला दिली. परराष्ट्र मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्यावर समन्स बजावला. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांनी या हेरगिरी प्रकरणाची माहिती देत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. महमूद अख्तरला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करून त्याने तातडीने देश सोडून जावे, असे निर्देश जयशंकर यांनी दिले.
हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याच्या सहभागाचा आरोप अब्दुल बासित यांनी फेटाळून लावला. पाकिस्तानचा अशा कोणताही प्रकरणात सहभाग नसतो, ज्यामुळे राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन होईल, असे बासित यांनी स्पष्ट केले. दूतावासातील अधिकार्‍याला देश सोडून जाण्याचे आदेश देणे म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप बासित यांनी केला.
पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याचा हेरगिरी प्रकरणात सहभाग असल्याबाबतचा आरोप खोडसाळ आणि निराधार आहे, भविष्यात भारताने अशा घटनेची पुनरावृत्ती करू नये, असे बासित यांनीच ठणकावले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2136 of 2221 articles)


♦लोकांनी दिले ‘चले जाव’चे नारे ♦पाकी सैनिकांचा आंदोलकांवर अमानुष अत्याचार. मुझफ्फराबाद, [२७ ऑक्टोबर] - गुलाम काश्मिरातील नागरिकांनी आज गुरुवारी काळा ...