Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाच राज्यांत फेबुवारी-मार्चमध्ये एकत्रित निवडणुका

पाच राज्यांत फेबुवारी-मार्चमध्ये एकत्रित निवडणुका

=आयोगाचे संकेत=
electioncommissionofindiaनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – उत्तरप्रदेश आणि अन्य चार राज्यांमध्ये पुढील वर्षी फेबु्रवारी-मार्चमध्ये एकाचवेळी अनेक टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिले आहेत.
पुढील वर्षी १ फेबु्रवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पाचही राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचा आयोगाचा प्रयत्न असून, देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मात्र किमान सात टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तरप्रदेशातील ८० पैकी ७२ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. अलीकडेच झालेल्या जनमत चाचणीतही राज्यात भाजपाच सत्तेवर येणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. याच अनुषंगाने भाजपाने निवडणूक प्रचारही जोरात सुरू केला आहे, हे विशेष!

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1529 of 1573 articles)


    =‘नापाक’ प्रयत्नांना चोख उत्तर देऊ : अरुणकुमार= जम्मू, [२३ ऑक्टोबर] - सीमेवर सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता कुठल्याही क्षणी ...