Home » ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य » पाणी वाटपाचा पंजाब सरकारचा कायदा बेकायदेशीर

पाणी वाटपाचा पंजाब सरकारचा कायदा बेकायदेशीर

⇒सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
⇒पंजाबमधील कॉंग्रेसच्या सर्व आमदारांचे राजीनामे
⇒अमरिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले,
amarindersinghअमृतसर, [१० नोव्हेंबर] – शेजारी राज्यांबरोबरचे पाणी वाटपाचे करार संपुष्टात आणण्यासाठी पंजाब सरकारने  सन २००४ साली मंजूर केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी रद्द केला. या निर्णयाने पंजाब सरकारला मोठा हादरा बसला आहे. पंजाब सरकारने याबाबत पूर्वी केलेला कायदा  हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत असून हा कायदा बेकायदेशीर आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा निषेध म्हणून पंजाब कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत, हे विशेष.
रावी-बियास या नद्यांच्या पाणी वाटपाचा मुद्दा निकालाच्या मुळाशी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने १७ मार्च रोजी पंजाब सरकार आणि केंद्र सरकार यांना सतलज-यमुना कालव्याच्या जमीन अधिग्रहणप्रकरणी ‘जैसे थे’ आदेश दिला होता. हरयाणा सरकारने या प्रकरणी जमीन अधिग्रहणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राष्ट्रपती राजवटीची मागणी
या निर्णयाने संतप्त झालेल्या पंजाबचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आज गुरुवारचा हा निकाल दिला. पाणी वाटपाच्या या करारामध्ये पंजाब, हरयाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.
हरयाणाला त्यांच्या वाट्याचे पाणी मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला सतलज युमना कालव्याचे उर्वरित बांधकाम करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने  बांधकामाचे निर्देश दिल्यानंतरही तत्कालिन अमरिंदर सिंग सरकारने शेजारी राज्यांबरोबरचे पाणी वाटप करार रद्द करण्यासाठी विशेष विधेयक आणून कायदा संमत केला होता.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, पंजाब-हरयाणा, राज्य (1509 of 1796 articles)


    =नेपाळ सेंट्रल बँकेचे आदेश= काठमांडू, [१० नोव्हेंबर] - ५०० आणि १००० हजार रुपयांच्या भारतीय नोटा वापरणे तातडीने थांबवा, असे आदेश ...