Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पाणी, वीज, मालमत्ता करासाठी जुन्या नोटा स्वीकारणार

पाणी, वीज, मालमत्ता करासाठी जुन्या नोटा स्वीकारणार

=राज्य शासनाच्या विनंतीला केंद्राची मान्यता=
devendra-fadnavis-6तभा वृत्तसेवा
मुंबई, [१० नोव्हेंबर] – केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पृष्ठभूमीवर जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याने केंद्र शासनाकडे केली होती. ही विनंती केंद्र शासनाने मान्य केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तशा सूचना महावितरणसह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय ९ रोजी घेण्यात आला आहे. त्यात मुंबईत येणारे प्रवेश बिंदू आणि मुंबई शहरातील टोल नाक्यांचा सुद्धा समावेश आहे. मुंबई मेट्रोला ५०० आणि १००० रुपयांचे चलन स्वीकारण्याचे आदेशही कालच देण्यात आले होते. त्याप्रमाणे आता कार्यवाही देखील सुरू आहे. संबंधित निर्णयाच्या पृष्ठभूमीवर राज्यातील सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शासकीय बिलांचा भरणा जुन्या नोटांद्वारे करण्यासंदर्भात निर्णय घेऊन जनतेस दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आता चलनाच्या समस्येमुळे सामान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
बँक आणि पोस्टामध्ये ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत आहे.
या निर्णयामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहणार असून त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये.
काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करू या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1321 of 1618 articles)


    =नवे रूप-वेगळा रंग= नवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] - पाचशे आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता हजार रुपयांची नवी नोटही ...