रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

रोहिंग्यांना भारतात थारा नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – म्यानमारमधून भारतात आलेले रोहिंग्या…

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने सहकार व मनुष्यबळ अकादमी स्थापणार

►जन्मशताब्दी समारंभाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली,…

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवरात्रौत्सवानिमित्त मोदी, योगींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर – नवरात्रौत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात…

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

भारतात फुटीचे राजकारण : राहुल

न्यूयॉर्क, २१ सप्टेंबर – भारतात नरेंद्र मोदी सरकारकडून फुटीचे…

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

पॅरिस कराराच्या पुढे जाऊन काम करू : सुषमा स्वराज

वॉशिग्टन, २१ सप्टेंबर – पर्यावरण रक्षणासाठी भारत वचनबद्ध असून…

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

पाकने शांतता, सहकार्यासाठी चर्चेचा मार्ग अनुसरावा : अश्रफ घनी

संयुक्त राष्ट्रे, २१ सप्टेंबर – पाकिस्तानने आता शांतता, सुरक्षा…

राणे कॉंग्रेसमुक्त!

राणे कॉंग्रेसमुक्त!

►तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो, सिंधुदुर्ग,२१ सप्टेंबर…

राज्यभरात पावसाने झोडपले

राज्यभरात पावसाने झोडपले

►हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, पुणे, १९ सप्टेंबर –…

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

सत्तेतून बाहेर पडण्यास २५ सेना आमदारांचा विरोध

►सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची हवा निघाली ►शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता…

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

ब्रह्मदेशातील बांगलादेशी

॥ विशेष : रमेश पतंगे | ब्रह्मदेशातील बौद्ध जनता…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश हत्या आणि त्यामागचे राजकारण…

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | गौरी लंकेश या…

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

काट्याचा नायटा होण्याआधीच रोहिंग्यांना हकला!

॥ वर्तमान : दत्ता पंचवाघ | बांगलादेशी मुस्लिमांनी जशी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » पुढील मुख्यमंत्री कोण, आमदारच निर्णय घेतील

पुढील मुख्यमंत्री कोण, आमदारच निर्णय घेतील

=परिवार एक, पक्ष एक: मुलायमसिंह यांचा संदेश=
लखनौ, [२५ ऑक्टोबर] – उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या समाजवादी पार्टीत आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवी अजूनही शमली नाही. कुटुंबात आता नवे महाभारत घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अखिलेश यादव हेच मुख्यमंत्री आहेत, पण पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले तर पुढील मुख्यमंत्री कोण राहील, याबाबतचा निर्णय पक्षाचे नवनियुक्त आमदारच घेतील, असे मुलायमसिंह यादव यांनी आज स्पष्ट केले.
गेल्या दिवसांपासून यादव कुटुंबात सुरू असलेल्या वादाची परिणती सोमवारी सपाच्या मुख्यालयातील बैठकीत घमासानात झाली होती. मुलायमसिह, अखिलेश आणि काका शिवपाल यादव यांनी एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत प्रकार केले. यानंतर आज मंगळवारी मुलायमसिंहांनी आपल्या निवासस्थानी काही निवडक नेत्यांची बैठक बोलावली होती. यात शिवपाल यादव यांच्यासह काही वरिष्ठ नेते उपस्थित होते. तथापि, अखिलेश यांनी मात्र बैठकीला पाठ दाखवली.
या बैठकीनंतर स्वत: नेताजींनी पत्रपरिषदेला संबोधित केले. पत्रपरिषदेलाही अखिलेश अनुपस्थित होते. आमचे कुटुंब एक आहे आणि पक्ष एक आहे, असा संदेश देताना मुलायमसिंह यांनी काही लोक पक्ष व सरकारविरोधात कटकारस्थान रचत आहे. मात्र, राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास नाही. असे कटकारस्थान जनताच उधळून लावणार आहे, असे मुलायमसिंह यांनी सांगितले.
रामगोपाल यादव यांच्या वक्तव्याकडे मी कदापि लक्ष देणार नाही. त्यांची विधाने तर्कशुद्ध नाहीत. ज्या लोकांना आम्ही पक्षाबाहेर केले, त्यांना आता पुन्हा जागा मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री या अधिकाराने ज्या मंत्र्यांची हकालपट्टी केली, त्यांना परत घेण्याबाबतचा निर्णय मी त्यांच्यावरच सोपवत आहे. त्यांना सरकारमध्ये परत घ्यायचे की नाही, हे त्यांनाच ठरवू द्या. मी यात हस्तक्षेप करणार नाही, असेही मुलायमसिह यांनी स्पष्ट केले.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला केवळ माझ्या नावावर बहुमत मिळाले होते. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत पक्षाला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याची क्षमता माझ्यात आहे. सपाला बहुमत मिळाल्यास नवनिर्वाचित आमदारच भावी मुख्यमंत्र्याबाबतचा निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
अखिलेशच्या यशावर मुलायमसिंह जळतात! : रामगोपाल यादव
नवी दिल्ली – मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी साडेचार वर्षांत अतिशय चांगली कामे केली आहेत. पण, विकासालाच विरोध असलेले मुलायमसिंह यादव, शिवपाल यादव आणि अमरसिंह यांना अखिलेशची कामे आवडली नाहीत. हे लोक त्यांच्या विकास कामांना जळतात, अशी टीका मुलायमसिंह यांचे चुलत बंधू रामगोपाल यादव यांनी केली. यामुळे पक्षात नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीनंतर अखिलेश यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्धार आहे आणि तो पूर्ण करणार आहेत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आपल्या मुलाने आपल्यापेक्षाही चांगली कामगिरी करावी, अशी प्रत्येकच पित्याची इच्छा असते. मात्र येथे सर्व प्रकार विरोधीच आहे. एका जादुगाराने नेताजींचे मन कलुषित केले आहे. पक्षात आज जी यादव निर्माण झाली आहे, त्यामागेही हाच जादूगर आहे, असे सांगताना त्यांनी अमरसिंह यांच्यावरही हल्ला चढवला.
अमरसिंह यांनी आपल्याला तुरुंगात जाण्यापासून वाचवले होते, असे विधान करण्यापूर्वी मुलायमसिंहांनी शंभर वेळा विचार करायला हवा होता. या विधानाचा अर्थ म्हणजे एक तर अमरसिंह यांनी न्यायालयाला किंवा सीबीआयला आपल्याकडे केले, असा होतो. खर्‍या नाण्याला बाजूला सारून बाजारात खोटे नाणेच वापरले जाते. अमरसिंह यांना एवढे महत्त्व का देण्यात आले, याचे उत्तर नेताजी व शिवपाल यांच्याकडे आहे काय, असा उपहासात्मक टोलाही रामगोपाल यांनी लगावला.
‘तो मी नव्हेच’ : अमरसिंह यांची भूमिका
कोलकाता – समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यांच्यात भांडण लावणारा मी नव्हेच, असे स्पष्ट करून पिता-पुत्रात भांडण लावून मला काय मिळणार आहे, असा सवाल सपाचे राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी केला.
अखिलेश यादव यांना मुलायमसिंह यांच्यासारखे वडील मिळाले आहेत आणि ते समाजवादी पार्टीतील प्रत्येकासाठीच पित्यासारखे आहेत, असे मत अमरसिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
अमरसिंह हेच मुलायमसिंह कुटुंबातील यादवीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप करीत अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. कुटुंबातील वाद गंभीर झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत शिवपाल यादव आणि अमरसिंह या दोघांचीही पाठराखण केली होती.
पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले रामगोपाल यादव हे नपुंसक आहेत. मी स्वत: सोमवारी अखिलेशला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलेश लहान असताना मी त्याला खेळवले आहे. त्याने या वादाबद्दल माझ्याशी एकदा चर्चा करायला हवी होती. या वादाला मी कारणीभूत नाही. पित्रा-पुत्रात वाद निर्माण करण्यात माझा काहीच संबंध नाही, असेही अमरसिंह यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (1960 of 2019 articles)


=एकाचा मृत्यू, ६ जखमी, गृहमंत्रालयाने मागविला अहवाल= नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] - दिल्लीच्या नया बाजार परिसरात जोरदार स्फोट झाल्यामुळे एकच ...