Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

petrol_rupeeनवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. पेट्रोलच्या प्रती लिटर किमतीत ८९ पैशांची आणि डिझेलच्या किमतीत ८६ पैशांची वाढ करण्यात आली. आज शनिवारी मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ अंमलात आली आहे.
सप्टेंबरपासून आतापर्यंत या दोन्ही इंधनांमध्ये झालेली ही सलग सहावी दरवाढ आहे. यात स्थानिक विक्रीकर आणि व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात ही दरवाढ यापेक्षाही जास्त राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ही अत्यल्प दरवाढ करणे अनिवार्य झाले असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. यापूर्वी, १६ ऑक्टोबर रोजी पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1796 of 1994 articles)


    ♦अम्फिबियन विमाने ♦दहा हजार कोटींचा करार होण्याची शक्यता ♦पंतप्रधान मोदी ११ पासून जपान दौर्‍यावर, नवी दिल्ली, [५ नोव्हेंबर] - पंतप्रधान ...