रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पोलिस कारवाईवर प्रश्‍नचिन्ह नको : रिजिजू

पोलिस कारवाईवर प्रश्‍नचिन्ह नको : रिजिजू

=दहशतवादाचे राजकारण करू नये : श्रीकांत शर्मा =
kiran-rijijuनवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – पोलिसांच्या कारवाईवर नेहमी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे बंद केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज केले.
भोपाळ येथे तुरुंगातून फरार झालेल्या सिमीच्या ८ कुख्यात अतिरेक्यांचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला, या कारवाईवर कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. याचा खरपूस समाचार घेताना रिजिजू म्हणाले की, अप्रमाणित व्हिडीओच्या आधारे कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचणे थांबवले पाहिजे. चौकशीत सर्व वस्तुस्थिती समोर येईल. एका व्हिडीओच्या आधारे अधिकारी आणि पूर्ण पोलिस दलावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. अशा चकमकीनंतर अधिकारी आणि पोलिस दलाच्या कारवाईवर टीका करण्याच्या काही नेत्यांच्या सवयीचा रिजिजू यांनी निषेध केला.

दहशतवादाचे राजकारण करू नये : श्रीकांत शर्मा
माणुसकी आणि नैतिकता असेल तर कोणत्याही राजकीय पक्षाने दहशतवादाच्या मुद्याचे राजकारण करू नये, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी आज केले.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत शर्मा म्हणाले की, भोपाळ येथील तुरुंगातून ८ अतिरेकी फरार झाले, नंतर पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले. मात्र कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी या चकमकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहे. या अतिरेक्यांशी लढताना रामशंकर यादव नावाचा पोलिस शहीद झाला, पण या शहीद पोलिसाबद्दल कॉंग्रेस आणि आपचे नेते बोलायला तयार नाहीत, त्यांना काळजी पडली ती चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची.
देशाच्या सुरक्षेला धोका असणार्‍या अतिरेक्यांना चकमकीत ठार मारणार्‍या बहादूर पोलिस शिपायांचे भाजपा अभिनंदन करते, त्यांना मनापासून धन्यवाद देते, असे स्पष्ट करत शर्मा म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेवरचा मोठा कलंक आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज होत असताना आपल्या देशातील काही राजकीय पक्ष अतिरेक्यांची पाठराखण करतात, दहशतवादी संघटनांबद्दल सहानुभूती दाखवतात, हे दुर्दैवी आहे.
याआधी बाटला हाउसची चकमक झाली, अतिरेक्यांचा सामना करताना त्यात मोहनचंद्र शर्मा नावाचे पोलिस अधिकारी शहीद झाले, त्यावेळी पण इटली कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंह यांनी या चकमकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
इटली कॉंग्रेस व्होट बँकेचे, अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे. मुस्लिमांकडे मतांची फॅक्टरी म्हणून पाहात आहे. त्यामुळेच जनतेने कॉंग्रेसला अनेकवेळा धडा शिकवला, तरीही इटली कॉंग्रेसच्या नेत्यांचे डोळे उघडत नाही, असा आरोप शर्मा यांनी केला.
कॉंग्रेसला आमच्याशी स्पर्धा करायचीच असेल तर त्याने विकासाच्या मुद्यावर करावी, पण घृणेचे राजकारण करू नये, अतिरेक्यांची पाठराखण करून कॉंग्रेस आणि ‘आप’ला देशात कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्‍नही शर्मा यांनी उपस्थित केला.
………………………………….

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2115 of 2248 articles)


=कामगिरी समाधानकारक पातळीवर= नवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] - केंद्र सरकारच्या काही ठोस उपायांमुळे विद्युत उपकरण, वाहननिर्मिती आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील ...