रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » प्रेरणा शिबिरासाठी राजधानी सज्ज

प्रेरणा शिबिरासाठी राजधानी सज्ज

=देशभरातून अडीच हजार सेविका दाखल, आज उद्‌घाटन=
rashtra-sevika-samiti-sanchalan1नवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय प्रेरणा शिबिरासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. या शिबिराचे उद्‌घाटन उद्या शुक्रवार, ११ नोव्हेंबरला रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
छतरपूर परिसरातील तेरा पंथ जैन मंदिरात आयोजित आणि तीन दिवस चालणार्‍या या शिबिरात समितीच्या देशभरातील अडीच हजार पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज नागपूरहून दिल्लीत आगमन झाले.
रा. से. समितीच्या स्थापनेला विजयादशमीला ८० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त समितीच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन पुढील कामकाजाची दिशा ठरवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीच्या केंद्रीय पदाधिकारी चित्रा जोशी यांनी तभाशी बोलताना सांगितले.
समितीच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तसेच पुढील कामाच्या दृष्टीने समितीच्या देशभरातील लाखो सेविकांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने या शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चित्रा जोशी यांनी स्पष्ट केले.
राजधानी दिल्लीत रा. से. समितीच्या अशा शिबिराचे २० वर्षांनी आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी १९९६ मध्ये दिल्लीत अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याकडे लक्ष वेधत चित्रा जोशी म्हणाल्या की, समितीची स्थापना १९३६ मध्ये झाली असली तरी राष्ट्रीय स्तरावरील शिबिराच्या आयोजनाला सुरुवात १९४५ मध्ये झाली. १९८६ पर्यंत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्तरावरील शिबिराचे आयोजन केले जात होते. मात्र १९८६ पासून दर दहा वर्षांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले जात आहे.
२००५ मध्ये मावशी केळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरला भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या शिबिराला समितीच्या देशभरातील दहा हजार सेविका उपस्थित होत्या, असे जोशी यांनी सांगितले.
समितीच्या स्थापनेला ८० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभर युवती संमेलनाचे आयोेजन करण्यात आले होते. देशात अशा प्रकारची २९१ युवती संमेलने झाली, ‘तेजोमय भारत’ या नावाने झालेल्या या संमेलनाची मध्यवर्ती कल्पना ‘हम है भारत भाग्यविधाता’ अशी होती. यात जवळपास एक लाख युवती सहभागी झाल्याचे समितीच्या सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी सांगितले.
समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या ९ महिलांचा या शिबिरात सत्कार केला जाणार आहे. यासाठी क्रीडा क्षेत्रातून एव्हरेस्ट पादाक्रांत करणार्‍या संतोष यादव, राष्ट्रीय कबड्डीपटू शिखा रावत, बॉक्सर रितू मलिक, पर्यावरण क्षेत्रातील जनक पडराजी, शांती, कविता उमाशंकर आणि आयुर्वेद क्षेत्रातील डॉ. शार्दुली तेरवडकर, आफ्रिकेतील डॉ. कीर्ती आणि डॉ. करिश्मा यांचा समावेश असल्याचे अलका इनामदार यांनी सांगितले.
तेरापंथ मंदिराच्या परिसरात आयोजित या शिबिराच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात होता. प्रदर्शनाची मांडणी केली जात होती.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2075 of 2398 articles)


=एक दहशतवादी ठार, भारतीय जवान शहीद= श्रीनगर, [१० नोव्हेंबर] - पाकिस्तानी लष्कराच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये एक भारतीय जवान शहीद ...