Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » बगदादीचे मोसूलमधून पलायन!

बगदादीचे मोसूलमधून पलायन!

=इराकी लष्कराची आतवर मुसंडी=
लंडन/मोसूल, [४ नोव्हेंबर] – इसिसचा म्होरक्या अबू बगदादीने मोसूलमधून पलायन केल्याचे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री बोरीस जॉन्सन यांनी गुप्तचर खात्याच्या हवाल्याने म्हटले आहे. एकीकडे शेवटापर्यंत लढा, असे आवाहन इसिसच्या दहशतवाद्यांना करणार्‍या बगदादीने मोसूल शहरातून पळ काढल्याची माहिती आम्हाला गुप्तचर यंत्रणांनी दिली असल्याचे आज शुक्रवारी जॉन्सन यांनी हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले.
इराकी लष्कर, मोसूल शहराच्या आत दहशतवाद्यांच्या ताब्यातील भागात घुसले आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच लष्कराने अशी मुसंडी मारली आहे. इराकी जवानांनी सुमारे सहा हजार जिहादींना घेरले आहे. अमेरिका आणि त्याची लष्करी आघाडी, इराक आणि कुर्दिश सैन्याद्वारे सुरू असलेल्या या लष्करी मोहिमेदरम्यान स्थानिक लोक मोठ्या संख्येने मोसूलमध्ये येत आहेत. परिणामी, इराकचे दुसरे मोठे शहर असलेले मोसूल इसिसच्या ताब्यातून घेण्यासाठीची लढाई निर्णायक टप्प्यात आली आहे.
दहशतवादी आणि इराकी सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. शहरात धुमश्‍चक्री सुरू आहे. इराकी सैन्य आणि कुर्दिश योद्धे मोसूलवर ताबा मिळवण्यासाठी मागील १५ दिवसांपासून लढत आहेत. अनेक दहशतवादी आणि त्यांच्या नातेवाईंकांनी जिवाच्या भीतीने शहरातून पलायन केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1531 of 1736 articles)


    =सर्वांचेच कव्हरेज सारखे, मगच आमच्यावर बंदी का?= नवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] - पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तसंकलन ...