Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बळजबरीच्या देणगीची लष्कराला गरज नाही

बळजबरीच्या देणगीची लष्कराला गरज नाही

=संरक्षणमंत्री पर्रीकर यांची स्पष्टोक्ती=
manohar-parrikarनवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – भारतीय लष्कर केवळ स्वेच्छेने दिलेली देणगीच स्वीकारते. कोणाच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची लष्कराला अजिबात गरज नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मंगळवारी स्पष्ट केले.
दिग्दर्शक करण जौहर यांच्या ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराची भूमिका असल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची धमकी दिली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि करण जौहर यांना आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून यावर तोडगा काढला होता. जौहर यांनी पाच कोटी रुपये शहीद जवानांच्या निधीत जमा करावे, ही राज ठाकरे यांची अट मान्य केल्यानंतर नवा वाद उफाळून आला होता.
आज भारतीय नौदलाच्या कमांडर परिषदेचे उद्‌घाटन केल्यानंतर पत्रपरिषदेत पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री या नात्याने आपली भूमिका विशद केली. चार दिवस चालणार्‍या या परिषदेत पर्रीकर यांनी नौदलाच्या तयारीचा आढावा घेतला.
शहीद जवानांच्या निधीत देशातील कोणताही नागरिक आपले योगदान देऊ शकतो. पण, हा निधी स्वेच्छेने दिलेला असावा. कोणी जर दुसर्‍याच्या मानगुटीवर बसून अशा प्रकारे निधी वसूल करीत असते, तर तो आम्ही कदापि स्वीकारणार नाही, असे पर्रीकर यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2035 of 2099 articles)


=उद्योगजगतात शह-प्रतिशह!= मुंबई/नवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर उद्योगजगतात शह-प्रतिशहाने वातावरण ढवळून ...