Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » बाबरी मशीद केंद्राच्या ताब्यात न घेणे नरसिंह राव यांची घोडचूक

बाबरी मशीद केंद्राच्या ताब्यात न घेणे नरसिंह राव यांची घोडचूक

♦लष्कराचा उपयोग करायला हवा होता
♦‘टाटा लिटरेचर लाईव्ह’मध्ये चिदंबरम यांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
मुंबई, २० नोव्हेंबर –
p-chidambaram_11बाबरी मशीद केंद्र सरकारच्या ताब्यात न घेणे, ही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची घोडचूक होती, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज रविवारी येथे केले. मुंबईमध्ये आयोजित ‘टाटा लिटरेचर लाईव्ह’ या साहित्य उत्सवात ‘नरसिंह राव : दि फॉरगॉटन हिरो’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना त्यांनी सदर प्रतिपादन केले.
चिदंबरम म्हणाले, बाबरी मशिदीला धोका असल्याचे ढीगभर पुरावे नरसिंह राव सरकारकडे होते. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. केवळ ‘निर्णयातील चूक’ म्हणून मी बाबरीची घटना बाजुला ठेवू शकत नाही. या घटनेमुळेच नरसिंह राव यांना कॉंग्रेस पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्‍वास गमवावा लागला.
बाबरी मशिदीला धोका असल्याचा इशारा अनेक मंडळींनी नरसिंह राव यांना दिला होता. आमच्या सरकारने कुठल्याही परिस्थितीत बाबरी मशीद उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे निवेदनही जारी केले होते. गरज पडल्यास निमलष्करी दल आणि प्रसंगी लष्करही तैनात करण्यात येईल, असे देशाला सांगितलेले होते.
मशिदीला निर्माण झालेला धोका एकाएका निर्माण झालेला नव्हता. कारसेवकांची ती उत्स्फुर्त प्रतिक्रियाही नव्हती. थेट रामेश्‍वरम येथून शीला आणण्यात आल्या. यासाठी रेल्वेगाड्यांचा उपयोग झाला. त्यावेळी संपूर्ण रेल्वेगाड्या खचाखच भरलेल्या होत्या. लाखो लोकं अयोध्येला जमतील असे प्रत्येकालाच ठाऊक होते. अन्यथा हातोडे, कुदळी या आल्या कुठून? १९८७-८८पासूनच बाबरी मशिदीला धोका होता, असा दावाही यावेळी चिदंबरम यांनी केला.
नरसिंह राव यांनी निमलष्करी दल आणि लष्कराचा उपयोग करायला हवा होता. केंद्र सरकारच्याच ताब्यात बाबरी मशीद असल्याचे त्यांनी स्पष्ट करायला हवे होते. मात्र तसे न करून त्यांनी घोडचूक केली. त्यानंतरचे पडसाद सर्व देशासाठी अतिशय घातक सिद्ध झालेत, असे चिंदबरम यावेळी म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

 • दृष्टीक्षेपात

  व्हिडीओ संग्रह

  मागील बातम्या, लेख शोध

  Search by Date
  Search by Category
  Search with Google
  More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1555 of 1994 articles)


  वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० नोव्हेंबर - देशात सध्या चलन तुडवडा असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज मुक्त बँकिंग सेवा पुरविण्यासाठी शरियानुसार ...