Home » आंध्र, ठळक बातम्या, राज्य » बाहुबलीच्या निर्मात्यावर आयकर धाड

बाहुबलीच्या निर्मात्यावर आयकर धाड

industry-shocked-with-it-raids-on-bahubali-producers_it-raidहैदराबाद, [१२ नोव्हेंबर] – गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेल्या ‘बाहुबली’ चित्रपट निर्मात्याच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड घालून कसून झडती घेतली. हैदराबाद येथील बंजारा हिल्स आणि जुबली हिल्स या परिसरातील कार्यालयांवर या धाडी घालण्यात आल्या आहेत.
दक्षिणेतील अभिनेता प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबती यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाहुबली चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्वच विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले होते. जगभरातील सुमारे चार हजार चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेसोबतच हिंदीतही प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाने ५०० कोटींची कमाई केल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते.
चित्रपट निर्मात्याने या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात कमाई केली असतानाही, त्याने ती पूर्णपणे दाखवली नसल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर खात्याने दोन पथके तयार केली आणि निर्मात्याच्या दोन कार्यालयांची झाडाझडती घेतली. तथापि, या धाडीत आयकर अधिकार्‍यांच्या हातात नेमके काय लागले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आंध्र, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in आंध्र, ठळक बातम्या, राज्य (1471 of 1795 articles)


    =स्वित्झर्लंडमध्ये ऐतिहासिक संशोधन,माकड चालू लागला, आता माणसावर प्रयोग= बर्न, १२ [नोव्हेंबर] - अपघातात जखमी होऊन पाठीच्या कण्याला मार लागल्याने हजारो ...